
मुंबई: आयपीएलचा १४वा हंगाम ९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळेल. आयपीएलमध्ये फक्त फलंदाज नाही तर गोलंदाजांची देखील पाहायला मिळेल. या स्पर्धेत फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील स्पर्धेमुळे चाहत्यांचे मनोरंजन होते. वाचा- ... आयपीएलमधील या चुरशीमुळेच अनेक विक्रम होतात. या स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माकडे पाहिले जाते. पण या शिवाय रोहितच्या नावावर असा एक विक्रम आहे जो वाचल्यानंतर अनेकांना विश्वास बसणार नाही. वाचा- रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासातील असा एकमेव खेळाडू आहे ज्याने एका हंगामात ३००हून अधिक धावा केल्या आणि हॅटट्रिक देखील घेतली. २००९ साली आयपीएलमध्ये रोहितने हा अनोखा विक्रम केला. रोहितने त्या हंगामात ३६५ धावा केल्या. डेक्कन चार्जर्सकडून खेळताना त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. विशेष म्हणजे ज्या संघाविरुद्ध त्याने हॅटट्रिक घेतली होती त्याच संघाचा आज तो कर्णधार आहे आणि पाच वेळे विजेतेपद मिळवून दिले आहे. वाचा- २००९ साली आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आले होते. स्पर्धेच्या या दुसऱ्या हंगामातील ३२व्या सामन्यात रोहितने हॅटट्रिक घेतली होती. त्याने मुंबई इंडियन्सच्या डावातील १५व्या षटकात पाचव्या चेंडूवर अभिषेक नायर आणि अखेरच्या चेंडूवर हरभजन सिंगला बाद केले. त्यानंतर १७व्या षटकातील पहिल्या चेंडूवर रोहितने डुमिनीला बाद करत हॅटट्रिक पूर्ण केली. वाचा- आयपीएल २०२१ मध्ये रोहित शर्माला आणखी एक खास विक्रम करण्याची संधी आहे. रोहितने मुंबईला पाच वेळा आणि सलग दोन वेळा विजेतेपद मिळून दिले आहे. या वर्षी त्याला हॅटट्रिक करण्याची संधी आहे. त्याच बरोबर मुंबई इंडियन्सकडून ४ हजार ५०० धावा करणारा पहिला फलंदाज तो ठरू शकतो. यासाठी त्याला १६७ धावांची गरज आहे. असे झाल्यास आयपीएलमध्ये ४ हजार ५०० धावा करणारा तो पहिला कर्णधार ठरेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cJClRd
No comments:
Post a Comment