नवी दिल्ली: भारतात सध्या आयपीएल टी-२०चा धमाका सुरू आहे. या स्पर्धेत अनेक विक्रम होतातच. पण आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एक नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे हा विक्रम भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशातील क्रिकेटपटूने नव्हे तर नेपाळ सारख्या जागतिक क्रिकेटमध्ये फार मोठे नाव नसलेल्या देशातील खेळाडूने केला आहे. वाचा- जागतिक क्रिकेटमध्ये फार लहान असलेल्या देशातून देखील चांगले क्रिकेटपटू तयार होत आहे. नेपाळच्या या युवा क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय पदार्पणात धमाकेदार कामगिरी केली आहे. त्याने आजवर कोणत्याही क्रिकेटपटूला जमला नाही असा विक्रम केलाय. वाचा- ... टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या पहिल्या तीन सामन्यात अर्धशतक करण्याची कामगिरी कुशलने केली आहे. सोमवारी नेदरलँड विरुद्ध झालेल्या लढतीत त्याने ४६ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह ६२ धावा केल्या. या खेळीसह त्याने सलग तीन अर्धशतकाचा केला. या सामन्याआधी मलेशियाविरुद्ध ४१ चेंडूत ६१ तर नेदरलँड विरुद्ध ४६ चेंडूत ६२ धावा केल्या होत्या. वाचा- आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटला सुरुवात होऊन १६ वर्षापेक्षा अधिक कालावधी झालाय. पण कोणत्याही फलंदाजाला आजपर्यंत पदार्पणाच्या ३ सामन्यात अर्धशतक झळकावता आले नव्हते. पण ही कामगिरी कुशलने केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या सर्व सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा दिल्याने कुशलच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेलाय. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eo4IUi
No comments:
Post a Comment