
मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात पुन्हा एकदा संघाकडून खेळताना दिसेल. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये त्याने वैयक्तीक कारणामुळे माघार घेतली होती. पण या वर्षी तो पुन्हा संघात परत आला आहे. वाचा- चेन्नई सुपर किंग्जने गेल्या महिन्यातच खेळाडूंचे सर्वा सत्र आयोजित केले होते. आता अन्य खेळाडू देखील संघात आले असून सीएसकेच्या सराव सत्रात पुन्हा एकदा सुरेश रैना आणि यांची दोस्ती दिसत आहे. चेन्नई संघाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात रैना आणि धोनी फलंदाजी करताना दिसत आहेत. या दोघांना चेन्नईचे चाहते चिन्ना आणि थाला अशा नावाने हाक मारतात. वाचा- सराव सत्रात धोनी आणि रैना एकमेकांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. दोघांमध्ये हस्यविनोद देखील सुरू असल्याचे दिसते. इतक नाही तर रैना फलंदाजी करत असताना धोनी लांबून पाहत आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर चाहत्यांनी त्यावर भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. वाचा- व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर धोनी आणि रैना यांची मैत्री किती घट्ट आहे, यावर चाहते मत व्यक्त करत आहेत. वाचा- रैनाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो धोनी सोबत दिसतोय. हा फोटो शेअर करताना रैना म्हणतो, नेहमी डोळ्यांना डोळे भिडत नाहीत, तर हृदयाला हृदय मिळतात. रैनाने शेअर केलाला हा फोटो देखील व्हायरल होत आहे. क्रिकेट मैदानावरील ही प्रसिद्ध जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लगेच रैनाने देखील निवृत्ती जाहीर केली होती. जेव्हा रैनाने २०२० मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा मिस्टर आयपीएल रैना आणि धोनीमध्ये काही मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण या व्हिडिओ आणि फोटोने त्या सर्व चर्चा चुकीच्या असल्याचे सिद्ध केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cDGc1S
No comments:
Post a Comment