चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील डबल हेडरमधील पहिल्या लढतीत पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करत सनरायझर्स हैदाबादपुढे विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा राहुलचा निर्णय महागात पडला. वाचा- पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय पंजाबच्या अंगलट आला. पहिल्याच ओव्हरमध्ये राशिद खाने कॅच सोडला. पण त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारने राहुलचा बाद केले. त्याने चार धावा केल्या. त्यानंतर सातव्या षटकात खलील अहमदने दुसरा सलमीवीर मयांक अग्रवालला २२ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात निकोलस पुरन शून्यावर बाद झाला. यामुळे पंजाबची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली. वाचा- मैदानावर असेलल्या ख्रिस गेल आणि दीपक हुड्डा यांच्यावर सर्व मदार असताना राशिद खानने गेलचा अडथळा दूर केला. गेलने १५ धावा केल्या. त्यानंतर अभिषेक शर्माने दीपक हुड्डाला १३ धावांवर माघारी पाठवले. पंजाबचा निम्मा संघ ६३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. वाचा- या सामन्यात पदार्पण करणारा मोसेस हेनरिक्स १४ वर बाद करत अभिषेकने आणखी एक विकेट घेतली. अखेरच्या काही षटकात शाहरुख खानने धावांचा वेग वाढवला. पण १९व्या षटकात तो २२ धावांवर बाद झाला. पंजाबने २० षटकात १२० धावा केल्या. वाचा- हैदराबादकडून खलीद अहमदने ३, अभिषेक शर्माने दोन, भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tIFcQg
No comments:
Post a Comment