
दुबई: गेल्या काही आंतरराष्ट्रीय सामन्यात वादग्रस्त ठरलेला बाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत आयसीसीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यात अंपायर्स कॉलसह आणि तिसऱ्या अंपायरच्या संदर्भातील निर्णयाचा समावेश होता. वाचा- भारताचा कर्णधार विराट कोहलीने अंपायर्स कॉल संदर्भात हा नियम गोंधळात टाकतो असे मत व्यक्त केले होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेत अंपायर्स कॉलमुळे बराच वाद झाला होता. तर न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील लढतीत देखील अंपायर्स कॉलमुळे चुकीचा निर्णय दिला गेला होता. यापुढेही अंपायर्स कॉल हा DRSचा एक भाग असेल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. वाचा- DRSच्या सध्याच्या नियमात चेंडूचा ५० टक्के भाग कमीत कमी एका विकेटला लागला पाहिजे. असे नसेल तर फलंदाजला नाबाद दिले जाते. गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर आयसीसीच्या क्रिकेट समितीचे प्रमुख आणि भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे म्हणाले, डीआरएसचा हेतू सामन्यात होणाऱ्या स्पष्ट चूका दूर करण्याचा आहे. त्याच बरोबर मैदानावरील अंपायर्सची भूमिका कायम ठेवण्याचा आहे. यामुळेच अंपायर्स कॉल महत्त्वाचा आहे. विराटच्या मते चेंडूचा थोडा जरी भाग विकेटला लागत असेल तर फलंदाजाला बाद दिले जावे. वाचा- रिव्हूयमध्ये आता विकेट झोनची उंची वाढवण्यात आली आहे. यापुढे विकेटसोबत बेल्सचा देखील विचार केला जाणार आहे. यामुळे चेंडू जर बेल्सला लागणार असेल तर फलंदाजाला बाद दिले जाऊ जाईल. याआधी बेल्सच्या खालच्या भागा हा विकेट झोन म्हणून विचारात घेतला जात होता. याच बरोबर तिसरे अंपायर शॉर्ट रनच्या स्थितीत रिप्लेमध्ये त्याचा आढावा घेऊ शकतली. जर काही चूक झाली असेल तर पुढील चेंडू टाकण्याआधी त्यात सुधारणा केली जाईल. वाचा- वाचा- ...
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PQWMlU
No comments:
Post a Comment