
दुबई: भारतात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या आसीसीच्या बैठकीत टी-२० वर्ल्डकपसाठी एक संघ किती खेळाडूंना निवडू शकतो याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. वाचा- टी-२० वर्ल्डकपसाठी प्रत्येक संघ जास्ती जास्त २३ खेळाडूसह प्रवास करू शकतो. करोना व्हायरसमुळे आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या स्पर्धांसाठी आतापर्यंत फक्त १५ खेळाडू निवडण्याची अथवा त्यांच्या सोबत प्रवास करण्याची परवानगी होती. या सोबत सपोर्ट स्टाफसह ३० जणांना प्रवास करण्याची परवानगी होती. पण करोना व्हायरसचा विचार करता काही नियमात बदल करण्यात आले आहेत. वाचा- ... आयसीसीने मोठ्या स्पर्धेसाठी २३ खेळाडूंना निवडण्याची परवानगी दिली आहे. यातूनच अंतिम ११ जणांचा संघ निवडता येईल. करोना व्हायरसमुळे आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर त्याचा बदली खेळाडू मिळणार नाही. कारण याआधी बदली खेळाडू एका दिवसात मिळायचा. तेव्हा करोनाची समस्या नव्हती. पण आता खेळाडूंना बायो बबलमध्ये प्रवेश करण्यासाठी क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करावा लागतो आणि त्यानंतर संघात स्थान मिळते. वाचा- या अडचणीचा विचार करूनच आयसीसीने २३ खेळाडूंना सोबत घेण्याची परवानगी दिली आहे. पण या २३ पैकी कोणत्या १५ खेळाडूंना अंतिम संघात स्थान मिळेल आणि बाकीच्या खेळाडूंना रिझर्व्ह म्हणून असतील की सर्वच खेळाडू बेंच स्ट्रेंथचा भाग असतील किंवा अंतिम अकरा सोडून बाकी सर्वांना फिल्डिंग करता येईल याबाबत आयसीसीने स्पष्टीकरण दिले नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/31FjqQX
No comments:
Post a Comment