जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत पाकिस्तानचा फलंदाज १९३ धावांवर बाद झाला. फखरचे द्विशतक हुकले यापेक्षा चर्चा सुरू आहे ती तो ज्या पद्धतीने बाद झाला याची. या सामन्यात फकरने १५५ चेंडूत १८ चौकार आणि १० षटकार मारले. अखेरच्या षटकात तो धावा बाद झाला. वाचा- दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत ३४१ धावा केल्या होत्या. विजयाचे लक्ष्य गाठताना पाकिस्तानकडून फखरने अखेरपर्यंत लढा दिला. पण विकेटकिपर क्विंटन डी कॉकच्या चालाखीने तो धावबाद झाला. फखरच्या धावबाद होण्यावरून अनेक जण टीका करत आहेत. या सामन्यात पाकिस्तानला अखेरच्या षटकात ३१ धावांची गरज होती. फखर अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर धाव बाद झाला. वाचा- जर या सामन्यात त्याने द्विशतक केले असते तर ते वनडेमधील त्याचे दुसरे द्विशतक ठरले असेत. याआधी फखरने २० जुलै २०१८ रोजी झिम्बब्वेविरु्दध नाबाद २१० धावा केल्या होत्या. पाककडून वनडेत द्विशतक करणारा तो एकमेव फलंदाज आहे. वाचा- फेक फिल्डिंगचा नियम फखरला जरी द्विशतक करता आले नसले तरी त्याने एक वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. वनडेत लक्ष्याचा पाठलाग करताना म्हणजेच दुसऱ्या डावात कोणत्याही फलंदाजाकडून करण्यात आलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा याचा विक्रम मोडला. वॉटसनने २०११ साली बांगलादेशविरुद्ध नाबाद १८५ धावा केल्या होत्या. वाचा- सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाकडून झालेल्या ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी आहे. झिम्बब्वेच्या चार्ल्स कॉव्हेंट्रीने बांगलादेशविरुद्ध १९४ धावा केल्या होत्या. तेव्हा झिम्बब्वेचा पराभव झाला होता. धावांचा पाठलाग करताना झालेल्या सर्वोच्च धावा फखर जमा, पाकिस्तान- १९३ शेन वॉटसन, ऑस्ट्रेलिया- नाबाद १८५ एमएस धोनी, भारत- नाबाद १८३ विराट कोहली, भारत- १८३
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dG8rfY
No comments:
Post a Comment