
नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामाची तयारी सर्व संघांनी सुरू केली आहे. अद्याप काही खेळाडूंचा क्वारंटाइन कालावधी संपलेला नाही. ज्या खेळाडूंचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाला आहे ते अन्य खेळाडूंसोबत सराव करत आहेत. तर काही खेळाडू अद्याप हॉटेल रुममध्ये क्वारंटाइन मध्ये आहेत. वाचा- राजस्थान रॉयल्सचा ऑलराउंडर राहुल तेवतियाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल त्याच्या बेडरूममधील कॅमेरा बंद करण्यास विसरला आणि त्याचा व्हिडिओ अन्य कोणी नाही तर चक्क राजस्थान संघाने सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये राहुल क्वारंटाइन कालावधीत काय करतोय हे दिसते. व्हिडिओत तो काही वेळ फोनवर गप्पा मारतो. त्यानंतर फलंदाजीचा सराव करताना दिसतो. हा व्हिडिओ शेअर करताना संघाने म्हटले आहे की, राहुलला वाटते की त्याला कोणी पाहत नाही. वाचा- राहुल तेवतियाच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहा व्हिडिओ- गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात राहुल तेवतियाने धमाकेदार कामगिरी केली होती. त्याने १४ सामन्यात २५५ धावा केल्या आणि गोलंदाजीत १० विकेट घेतल्या. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात राहुलने शेल्डन कॉट्रेलच्या एका ओव्हरमध्ये पाच षटकार मारले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wovQLi
No comments:
Post a Comment