
मुंबई : भारतामध्ये यावर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकासाठी बीसीसीआयने पाकिस्तानच्या संघाला व्हिसा देण्याचे मान्य केले आहे. याबाबतची कल्पना त्यांनी आयसीसीला दिली आहे. पण यानंतरही पाकिस्तान अजून काही अटी ठेवू शकते. कारण त्यांनी जी मागणी केली होती, ती पूर्ण झाली नसल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या संघाला आम्ही विश्वचषक खेळण्यासाठी व्हिसा देऊ, असे बीसीसीआयने मान्य केले आहे. पण पाकिस्तानच्याच्या क्रिकेट मंडळाने याबाबत आयसीसीला एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी सांगितले होते की, पाकिस्तानच्या संघाबरोबरच चाहते, अधिकारी आणि पत्रकारांनाही भारताचा व्हिसा मिळायला हवा. त्याचबरोबर याबाबतचे लेखी हमीपत्रही पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाला हवे आहे. बीसीसीआयने आता पाकिस्तानच्या संघाला व्हिसा देण्याचे मान्य केले आहे. पण पाकिस्तानच्या चाहत्यांना यावेळी व्हिसा देणार की नाही, याबाबतची स्पष्ट भूमिका बीसीसीआयने घेतली नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे खेळाडूंच्या व्हिसाचा प्रश्न आता सुटला असला तरी आमच्या चाहत्यांना, अधिकाऱ्यांना आणि पत्रकारांनाही व्हिसा मिळावा, अशी अट पाकिस्तानचे क्रिकेट मंडळ ठेवू शकते. त्यामुळे आता या प्रश्नावर बीसीसीआय नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. खेळाडूंना तर बीसीसीआयने व्हिसा देण्याचा कबूल केले आहे, पण आता पाकिस्तानच्या चाहत्यांनाही भारताचा व्हिसा देण्यात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. भारतामध्ये जर आम्हाला प्रवेश देण्यात येणार नसेल, तर हा विश्वचषक दुसरीकडे खेळवण्यात यावा, अशी भूमिका पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने काही दिवसांपूर्वी घेतली होती. त्यावेळी भारताकडून आमच्या संघाला आणि चाहत्यांना व्हिसा मिळेल, याची हमीही पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आयसीसीकडे मागितली होती. या गोष्टीवर अखेर बीसीसीआयने आपला निर्णय दिला आहे. बीसीसीआयने याबाबत आयसीसीबरोबर संवाद साधला आहे. या संवादामध्ये आम्ही पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला भारतामध्ये येऊन विश्वचषक खेळण्यासाठी व्हिसा देणार आहोत, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा संघ भारतामध्ये येऊन ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये एकदाही पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतामध्ये आलेला नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २०१२-१३ पासून एकही क्रिकेटची मालिका झालेली नाही. त्याचबरोबर पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना आयपीएलमध्येही संधी देण्यात आलेली नाही. पण विश्वचषक ही मोठी स्पर्धा असते आणि त्याचे आयोजन आयसीसी करत असते. त्यामुळे जर यजमान देशाने एका संघाला जर व्हिसा दिला नाही तर स्पर्धेबाबत अन्य निर्णयही होऊ शकतो. त्यामुळे बीसीसीआयने हे पाऊल उचलल्याचे समजत आहे. बीसीसीायची १ एप्रिलला एक बैठक बोलवण्यात आली होती. याबैठकीमध्ये पाकिस्तानच्या संघाला आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी व्हिसा देण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Ohx8Xl
No comments:
Post a Comment