
नवी दिल्ली: गेल्या काही वर्षात भारतीय क्रिकेट संघाने यो-यो टेस्टची अट सर्व खेळाडूंना बंधनकारक केली आहे. ही टेस्ट पास झाल्याशिवाय भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळता येत नाही. अनेक खेळाडूंना ही टेस्ट पास न करता आल्याने भारतीय संघात निवड होऊन देखील खेळता आले नाही. वाचा- नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत वरुण चक्रवर्ती आणि राहुल तेवतिया यांचा संघात समावेश झाला होता. पण त्यांना पास न करता आल्याने संघात स्थान मिळाले नाही. तेवतियाने दुसऱ्या प्रयत्नात ही टेस्ट पास केली, पण चक्रवर्ती दुसऱ्या प्रयत्नात अपयशी ठरला. वाचा- या निवड प्रक्रियेवर बोलताना माजी सलामीवीर म्हणाला, संघातील निवडीसाठी यो-यो टेस्टच्या आधी कौशल्याला महत्त्व दिले जावे. क्रिकबझवर एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सेहवागने सांगितले की, जर आमच्यावेळी यो-यो टेस्ट असती तर , आणि व्हीव्हीएस लक्ष्मण सारखे महान खेळाडू कधीच ही टेस्ट पास करू शकले नसते. संबंधित चाहत्याने हार्दिक पंड्या गोलंदाजीसाठी फिट नसले तर वरुण चक्रवर्तीला का संधी दिली जात नाही असा प्रश्न विचारला होता. वाचा- मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, आपण यो-यो टेस्टची चर्चा करतोय. हार्दिक पंड्याला धावण्यात कोणतीही अडचण नाही. त्याच्या गोलंदाजीचे कारण कामाची जबाबदारी अधिक असे आहे. दुसऱ्या बाजूला अश्विन आणि चक्रवर्ती यांनी यो-यो टेस्ट पास केली नाही. मला या गोष्टी पटल्या नाहीत. जर हे मापदंड आधी असते तर सचिन, सौरव, लक्ष्मण ही टेस्ट कधीच पास करू शकले नसते. मी त्यांना कधी बीप टेस्ट पास करताना पाहिले नव्हते. ते नेहमी १२.५ गुणांनी मागे असत, असे सेहवाग म्हणाला. वाचा- काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने यो-यो टेस्ट पास केल्यानंतरच संघात स्थान मिळेल असे वक्तव्य केले होते. पण सेहवागने यावर असहमती दर्शवली होती. त्याच्या मते कौशल्य म्हत्त्वाचे आहे. फिटनेस ही नंतर देखील मिळवली जाऊ शकते. जर एखादा खेळाडू १० षटके गोलंदाजी करू शकत असेल आणि फिल्डिंग देखील करू शकत असेल तर हे पुरेसे आहे. अन्य गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही असे तो म्हणाला. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sHWcpm
No comments:
Post a Comment