
नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात नुकताच एक मजेदार किस्सा घडल्याचे पाहायला मिळाले. कारण भर मैदानात खेळाडूला आपली पँट काढण्याची वेळ आली. यावेळी चाहत्यांसह समालोचकांना हसू आवरता आले नाही. या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही गोष्ट घडली ती ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाच्या बाबतीत. उस्मान हा बिग बॅग लीगमध्ये सिडनी थंडर या संघाकडून खेळत आहे. उस्मान यावेळी सिडनीच्या संघाकडून फलंदाजी करण्यास मैदानात उतरला होता. यावेळी उस्मानने २५ चेंडूंत २६ धावा केल्या होत्या. त्यावेळी सिडनीच्या संघाच्या आठ षटकांमध्ये १ बाद ६० अशी स्थिती होती. त्यावेळी उस्मानवर भर मैदानात आपली पँट काढण्याची वेळ आली. काही वेळा खेळत असताना काही क्रीडा साहित्यांमध्ये बदल करावा लागतो. उस्मानला यावेळी आपला अॅपडॉमन गार्ड बदलायचा होता. त्यामुळे उस्मानने सुरुवातीला आपली पँट अर्धवट काढली. त्यानंतर त्याने आपले शूज काढले. त्यानंतर आपल्या ऑरेंज हाफ पँटवर उस्मानने गार्ड लावला होता. हा गार्ड त्याने यावेळी काढला. त्यानंतर सिडनीच्या संघाचा एक राखीन खेळाडू यावेळी उस्मानसाठी गार्ड घेऊन आला होता. उस्मानने तो गार्ड घातला आणि त्यानंतर पुन्हा पँट चढवून तो खेळायला लागला. उस्मानने सुरुवातीला जेव्हा पँट काढली तेव्हा कोणालाही काही समजले नव्हते. समालोचकही उस्मान नेमकं काय करतोय, याची चर्चा करत होता. पण उस्मानने जेव्हा आपला गार्ड काढला तेव्हा त्याला नेमकं काय करायचं आहे, हे समालोचकांनाही समजले. त्यावेळी एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर उस्मान जेव्हा या सर्व गोष्टी करत होता, तेव्हा मैदानातील प्रेक्षकांनाही नेमकं काय चाललं आहे, हे समजत नव्हते. त्यावेळी काही चाहत्यांनी उस्मानची हुर्योही उडवली. या सामन्या सिडनी थंडरला ब्रिस्बेन हिट संघाकडून ९ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. हा सामना एकतर्फी झाल्याचे पाहायला मिळाले. पण सामन्यात जेवढी रंगत भरलेली नव्हती तेवढी उस्मानच्या एका कृत्यामुळे पाहायला मिळाली. हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tiqgsc
No comments:
Post a Comment