चेन्नई: वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज कायरन पोलार्डने मुंबई इंडियन्सकडून खेळताना २२ चेंडूत धमाकेदार ३५ धावा केल्या. पोलार्डच्या या खेळीमुळे मुंबईला २० षटकात १५० धावापर्यंत मजल मारता आली. वाचा- हैदराबादविरुद्ध टॉस जिंकून मुंबईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. पण रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मुंबईच्या धावांचा वेग कमी झाला आणि विकेट देखील पडल्या. पोलार्ड जेव्हा मैदानावर आला तेव्हा मुंबईने ११४ धावांवर ४ विकेट गमावल्या होत्या. वाचा- त्यानंतर पोलार्डने १५९च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याने ३ षटकार आणि १ चौकार मारला. या दरम्यान पोलार्डने आयपीएलमधील २०० षटकार पूर्ण केले. पोलार्डने या डावात मारलेल्या ३ षटकारापैकी पहिला षटकार १०५ मीटर लांब गेला. वाचा- वाचा- ... पोलार्डचा हा षटकार आयपीएलच्या या हंगामातील आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार ठरला. याआधी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या ग्लेन मॅक्सवेलने १०० मीटर लांब षटकार मारला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3alhnGt
No comments:
Post a Comment