चेन्नई: आयपीएल २०२१च्या नवव्या साखळी लढत मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर १३ धावांनी विजय मिळवला. मुंबईचा तीन सामन्यातील आणि सलग दुसरा विजय ठरला. या विजयासह मुंबईने गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली आहे. वाचा- सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचा संघ गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर होता. तर RCB पहिल्या तर CSK दुसऱ्या स्थानावर होता. आजच्या विजयासह मुंबई इंडियन्सचे ३ लढतीत दोन विजय आणि एका पराभवासह ४ गुण झाले आहेत. तर त्यांची सरासरी प्लस ०.३६७ इतकी आहे. गुणतक्त्यात आरसीबीचे देखील चार गुण आहेत. त्यांनी दोन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. पण त्यांची सरासरी प्लस ०.१७५ इतकी आहे. वाचा- तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज असून त्यांनी दोन पैकी एक विजय एक पराभवासह दोन गुण मिळवले आहेत. त्यांची सरासरी प्लस ०६१६ इतकी आहे. दिल्ली कॅपिटल्स चौथ्या, राजस्थान रॉयल्स पाचव्या, कोलकाता नाइट रायडर्स सहाव्या, पंजाब किंग्ज सातव्या तर सलग तीन पराभवासह हैदराबादचा संघ अखेरच्या स्थानावर आहे. पंजाब आणि हैदराबाद या दोन्ही संघांची सरासरी वजा आहे. वाचा- आतापर्यंत झालेल्या सामन्यात सर्वाधिक धावा नितिश राणा याने केल्या आहेत. त्याने २ लढतीत १३७ धावा केल्या असून संजू सॅमसनने २ सामन्यात १२३ धावांसह दुसऱ्या तर जॉनी बेयरस्टो ३ सामन्यात ११० धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजीत आरसीबीचा हर्षल पटेल ७ विकेटसह अव्वल स्थानी आहे. मुंबईचा राहुल चहर ७ विकेटसह दुसऱ्या तर ट्रेंट बोल्ट ६ विकेटसह तिसऱ्या स्थानावर आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3twwfcH
No comments:
Post a Comment