चेन्नई: पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १४व्या हंगामातील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. आज झालेल्या सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादवर १३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत मुंबईने १५० धावा केल्या होत्या. हैदराबादने शानदार सुरूवात केली. पण मुंबईच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी करत विजय मिळून दिला. वाचा- विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादला कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्ट यांनी धमाकेदार सुरूवात करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ७.२ षटकात ६७ धावा केल्या. ही जोडी चांगल्या फॉर्ममध्ये असताना बेयरस्टो हिट विकेट झाला. त्याने २२ चेंडूत ४३ धावा केल्या. त्यानंतर आलेला मनिष पांडे २ धावा करून माघारी परतला. तर हार्दिक पंड्याने एक अफलातून थ्रो करून कर्णधार डेव्हिड वॉर्नरला धावबाद केले. त्याने ३४ चेंडूत ३६ धावा केल्या. वाचा- वॉर्नरच्या विकेटनंतर हैदराबादचा डाव गडगडला. मधळ्या फळीतील फलंदाजांनी हजेरी लावण्याचे काम केले. विराट सिंग ११, अभिषेक शर्मा २ आणि राशिद खान शून्यावर बाद झाले. एका बाजूने विकेट पडत असाना विजय शंकर मात्र लढा देत होता. पण अखेरच्या दोन षटकात जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी केली आणि हैदराबादचा १३७ धावांवर ऑल आउट केला. वाचा- हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी मुंबईला धमाकेदार सुरूवात करून दिली. या दोघांनी ५ षटाकत ४८ धावा केल्या. पण सातव्या षटकात विजय शंकरने रोहित शर्माला ३२ धावांवर बाद केले. त्याने २५ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव १० धावांवर बाद झाला. तर जम बसलेला सलामीवीर डी कॉक ४० धावांवर माघारी परतला. वाचा- ... मधळ्या फळीतील इशान किशनला आज धावाच करता आल्या नाहीत. त्याने २१ चेंडूत फक्त १२ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिकला पुन्हा एकदा अपयश आले. तो फक्त ७ धावा करू शकला. अखेरच्या काही षटकात कायरन पोलार्डने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला २० षटकात ५ बाद १५० पर्यंत मजल मारता आली. पोलार्डने २२ चेंडूत ३ षटकार आणि १ चौकारासह नाबाद ३५ धावा केल्या.हैदराबादकडून विजय शंकरने २ तर मुजिबने दोन विकेट घेतल्या. खलिद अहमदने एक विकेट घेतली. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gkHKjI
No comments:
Post a Comment