चेन्नई: ची प्रतिक्षा थोड्यात तासात संपणार आहे. आज रात्री सात वाजता आयपीएलच्या १४व्या हंगामातील पहिल्या सामन्याचा टॉस होईल. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात ही पहिली लढत होईल. दोन्ही संघ हंगामाची सुरूवात विजय मिळून करण्याचा प्रयत्न करतील. जाणून घेऊयात दोन्ही संघात कोणते खेळाडू असतील. वाचा- वाचा- मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. तर बेंगळुरूला एकदाही चषक उंचावता आला नाही. पहिल्या सामन्याआधी विराट आणि कंपनीला एक चांगली बातमी मिळाली आहे. युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कल संघात दाखल झाला आहे. करोनामुळे तो काही दिवसांपासून संघापासून वेगळा होता. मधळ्याफळीत रजत पाटिदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स यांना स्थान मिळेल. सराव सामन्यात रजतचा फॉर्म पाहता त्याला पदार्पणाची संधी मिळू शकते. त्यानंतर मोहम्मद अझरूद्दीन आणि वॉशिंग्टन सुंदरसह डेनियल ख्रिस्टियन यांना स्थान मिळण्याची शकते. गोलंदाजीत मोहम्मद सिराज, नवदीप सैनी आणि कायले जेमिसन यांच्यावर मुख्य जबाबदारी असेल आणि फिरकीमध्ये युजवेंद्र चहलला सुंदर आणि मॅक्सवेलची साथ मिळेल. वाचा- झटका मुंबई इंडियन्सचा विचार करायचा झाला तर रोहित आणि ख्रिस लिन ही सलामीची जोडी असेल. मधळ्याफळीत सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या यांच्यावर जबाबदारी असेल. त्यानंतर कायरन पोलार्ड आणि क्रुणाल पंड्या हे फटकेबाजी करण्यात मास्टर आहेत. हे दोघे गोलंदाजी देखील करू शकतात. जलद गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टला नाथन कुल्टल नाइल याची साथ असेल. राहुल चाहर हा मुख्य फिरकीपटू म्हणून संघात असेल. वाचा- संभाव्य संघ- मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, नाथन कुल्टर नाइल वाचा- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटिदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, मोहम्मद अझरूद्दीन, डॅन ख्रिस्टियन, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कायले जेमिसन
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wHSC0D
No comments:
Post a Comment