चेन्नई: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ, स्पर्धेचे विजेतेपद एक दोन वेळा नव्हे तर तब्बल पाच वेळा जिंकलेला संघ म्हणजे होय. आयपीएलच्या १४व्या हंगामाला आजपासून सुरूवात होत आहे. पहिली लढत गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. वाचा- या वर्षी मुंबई संघाला हॅटट्रिकची संधी आहे. त्यांनी २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे जर या वर्षी देखील विजय मिळवल्यास मुंबई हा आयपीएलच्या इतिहासात जेतेपदाची हॅटट्रिक करणारा पहिला संघ ठरेल. अशी संधी याआधी फक्त चेन्नई सुपर किंग्जला मिळाली होती. पण २०१०, २०११ अशी सलग दोन विजेतेपद मिळवल्यानंतर २०१२ साली कोलकाता संघाने अंतिम फेरीत त्यांचा पराभव केला होता. वाचा- मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० अशी पाच विजेतेपद मिळवली आहे. या संघाची कामगिरी जबरदस्त अशी आहे. पण आज होणार पहिल्या लढतीत मात्र मुंबई इंडियन्सचा पराभव होण्याची शक्यता आहे. २०११ नंतर मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील पहिल्या सामन्यात विजय मिळवलेला नाही. ज्या वर्षी मुंबईने पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते त्यावर्षी त्यांनी पहिल्याच सामन्यात पराभव स्विकारला होता. त्यानंतर गेल्या वर्षापर्यंत म्हणजे २०२० पर्यंत त्यांना पहिल्या सामन्यात पराभव झाला. वाचा- ... २०१९ सालच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ३७ धावांनी त्यांचा पराभव केला होता. तर २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्ज जो सातव्या क्रमांकावर राहिला होता त्यांनी पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव केला होता. अर्थात या दोन्ही हंगामात मुंबईने विजेतेपद मिळवले होते. वाचा- मुंबई इंडियन्सचा इतिहास पाहता या वर्षी त्यांच्या समोर पहिल्या सामन्यात विजय मिळवण्याचे आव्हान असेल. गेल्या आठ वर्षात जे जमले नाही ते स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आणि कंपनीला करू दाखवावे लागणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RcVH8M
No comments:
Post a Comment