Ads

Thursday, April 8, 2021

आजपासून IPL 2021 ला सुरूवात; हिटमॅन रोहित विरुद्ध रनमशीन विराट यांच्यात पहिली लढत

चेन्नई: करोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंखेच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत आयपीएल टी-२० ( ) लीगच्या १४व्या हंगामाला सुरूवात होत आहे. आयपीएल २०२१ची सुरुवात आज शुक्रवारपासून होत आहे. पहिली लढत पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या आणि () यांच्यात होणार आहे. बेंगळुरूला आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही. मुंबईचे नेतृत्व रोहित शर्मा तर बेंगळुरूचे नेतृत्व भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली करत आहे. गेल्या वर्षी करोनामुळे आयपीएल स्पर्धा युएईमध्ये झाली होती. तेव्हा देखील प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला नव्हता. यावर्षी देखील प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. भारतात या वर्षाच्या अखेरीस टी-२० वर्ल्डकप होणार आहे. यासाठी आयपीएल स्पर्धा एक प्रकारची टेस्टच असेल. जर बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन यशस्वीपणे केले तर आयसीसीला करोना स्थितीत देखील वर्ल्डकप सुरक्षितपणे होऊ आयोजित केला जाऊ शकतो यावर विश्वास बसेल. या वर्षी आयपीएल स्पर्धा देशातील सहा शहरात आयोजित होणार आहे. पहिल्या टप्प्यातील २० लढती चेन्नई आणि मुंबईत होणार आहेत. त्यानंतर अहमदाबाद आणि दिल्लीत १६ लढती होतील. तर अखेरच्या २० लढती बेंगळुरू आणि कोलकाता येथे आयोजित केल्या जातील. प्लेऑफ आणि अंतिम लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील. मुंबईची नजर जेतेपदाच्या हॅटट्रिकवर मुंबई इंडियन्सने २०१९ आणि २०२० साली विजेतेपद मिळवले होते. आता त्यांचा प्रयत्न हॅटट्रिक करण्याचा असेल. अशी कामगिरी केली तर ते सलग तीन विजेतेपद मिळवणारे पहिले ठरतील. याआधी चेन्नई सुपर किंग्जने २०१० आणि २०११ साली सलग दोन वेळा विजेतेपद मिळवले होते. पण त्यांना हॅटट्रिक करता आली नव्हती. २०१२च्या फायनलमध्ये त्यांचा कोलकाताने पराभव केला होता. २०१३ पासून आठ वर्ष मुंबई इंडियन्स आयपीएलमधील त्यांच्या पहिल्या मॅचमध्ये पराभूत होत आले आहेत. खराब सुरुवातीनंतर देखील ते नंतर चागंली कामगिरी करतात. या वर्षी पहिली लढत बेंगळुरू विरुद्ध होणार आहे. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स आठ वर्षातील खराब सुरूवातीचा रेकॉर्ड मोडणार का हे पाहावे लागेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3d1ajjX

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...