चेन्नई: फक्त भारतीय क्रिकेट नाही तर जागतिक क्रिकेटमध्ये लोकप्रिय असलेल्या आयपीएल ()च्या नव्या हंगामाला आजपासून सुरूवात होत आहे. आयपीएलचा गेला हंगाम फक्त ५ महिन्यांपूर्वी झाला होता. करोनामुळे २०२०चा हंगाम उशिरा झाला होता. IPL २०२० स्पर्धा नोव्हेंबर मध्ये युएईत खेळवण्यात आली होती. तेव्हा मुंबई इंडियन्सने विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवले. वाचा- आयपीएलच्या १४व्या हंगामाची सुरूवात आणि () यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर होत आहे. बेंगळुरू संघाचे नेतृत्व विराट कोहली तर मुंबईचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. हे दोघेही खेळाडू भारतीय संघात कर्णधार आणि उपकर्णधार या भूमिकेत असतात. आता आयपीएलमध्ये रोहित विक्रमी सहावे आणि विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी तर विराट पहिल्या जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. वाचा- रोहितने मुंबईला २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० अशी पाच विजेतेपद मिळून दिली आहेत. तर विराटच्या संघाला आतापर्यत तीन वेळा अंतिम फेरीत पोहतचा आले, पण विजेतेपद मिळाले नाही. वाचा- लढत क्रिकेटच्या या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये रोहित शर्मा हा धमाकेदार फलंदाज म्हणून ओळखला जातो. विराटला भलेही विजेतेपद मिळाले नसेल पण कर्णधार आणि फलंदाज म्हणून त्याने मोठी उंची गाठली आहे. त्यामुळे या पहिल्या लढतीत विजयासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. हेड टू हेड दोन्ही संघात आयपीएलमध्ये आतापर्यंत २७ लढती झाल्या आहेत. यापैकी १७ लढतीत मुंबईने तर १० लढतीत बेंगळुरूने बाजी मारली आहे. पिच रिपोर्ट चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम हे फिरकीसाठी प्रसिद्ध आहे. प्रथम फलंदाजी करणारा संघ १६० ते १७० पर्यंत धावा करू शकतो. ही धाव संख्या विजयासाठी पुरेशी आहे. वाचा- झटका आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने २०४ पैकी १२० सामने जिंकले, तर ८३ मध्ये त्यांचा पराभव झाला. बेंगळुरू संघाने १६८ पैकी ८० मध्ये विजय आणि ८४ मध्ये त्यांचा पराभव झालाय. केव्हा, कधी आणि कुठे पाहाल सामना मुंबई आणि बेंगळुरू यांच्यातील सामना आज (९ एप्रिल) संध्याकाळी सात वाजता सुरू होईल. या सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि हॅटस्टारवर पाहता येईल. या शिवाय सामन्याचा लाइव्ह स्कोअर कार्ड आणि LIVE अपडेट महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइवर तुम्ही पाहू शकता. संभाव्य संघ- मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, नाथन कुल्टर नाइल वाचा- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटिदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, मोहम्मद अझरूद्दीन, डॅन ख्रिस्टियन, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कायले जेमिसन
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PM3TfO
No comments:
Post a Comment