चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामाला पुढील काही तासात सुरुवात होणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून करोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियममध्ये होणार आहे. प्रेक्षकांना हे सामने घरी टीव्हीवर live पाहावे लागतील. वाचा- या स्पर्धेचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने १४व्या हंगामासाठी समालोचकांची मोठी टीम जाहीर केली आहे. जवळपास दोन महिने चालणाऱ्या या स्पर्धेचे समालोचन इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ, मळ्याळम, तेलगू आणि बंगाली भाषेत केले जाणार आहे. यासाठी स्टारने माजी खेळाडूंचा समावेश असलेल्या १०० जणांची टीम जाहीर केली आहे. यात जगभरातील अनेक दिग्गज क्रिकेटपटू आहेत. वाचा- वर्ल्ड फिड टीम- मॅथ्यू हेडन, केव्हिन पीटरसन, मायकल स्लेटर, डॅनी मॉरिसन, इयान बिशप, हर्षा भोगले, सायमन डल, एमबांग्वा, डारेन गंगा, सुनील गावस्कर, मार्क निकोलस, अजित आगरकर, निक नाइटर, दीप दासगुप्तान, रोहन गावस्कर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, अंजुम चोप्रा, लिसा स्थळेकर, मेल जोस, एलन विक्सि वाचा- झटका डगआउट- स्कॉट स्टायरिस, ब्रेट ली, डोमिनिक कॉर्क, ब्रायन लारा, ग्रॅमी स्वान, केव्हिन पीटरसन, शेन वॉटसन, रॉस टेलर, डेल स्टेन आणि नासिर हुसैन वाचा- हिंदी- आकाश चोप्रा, निखिल चोप्रा, गौतम गंभीर, अजित आगरकर, इरफान पठाण, पार्थिव पटेल, आरपी सिंग, दीप दासगुप्ता, सुनिल गावस्कर या समालोचकांमध्ये सर्व दिग्गजांचा समावेश आहे. पण एक मोठे नाव दिसत नाही. हे नाव म्हणजे अन्य कोणी नाही तर होय. गेल्या काही वर्षापासून वादामुळे मांजरेकर यांचे नाव समालोचकांच्या यादीतून बाहेर आहे. भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजासोबत झालेल्या वादानंतर मांजरेकरांना डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ते पुन्हा समालोचन करताना दिसले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RmEWrW
No comments:
Post a Comment