मुंबई : आयपीएलच्या १४व्या हंगामात आज आणि यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडूला राजस्थान रॉयल्स संघाकडून पदार्पणाची संधी मिळू शकते. तर प्रतिस्पर्धी संघात देखील मोठी रक्कम देऊन खरेदी केलेला खेळाडू आहे. राजस्थान रॉयल्सने या वर्षातील लिलावात ख्रिस मॉरिसला विकत घेतले. यासाठी त्यांनी १६.२५ कोटी इतकी रक्कम मोजली होती. गेल्या वर्षी ख्रिस रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळला होता. आता तो राजस्थानकडून खेळताना दिसेल. पंजाब संघाने ऑस्ट्रेलियाच्या झाय रिचडर्सनला १४ कोटींची बोली लावून विकत घेतले. आयपीएल लिलावात सर्वाधिक बोली लागलेल्या या दोन खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. हे दोन्ही खेळाडू जलद गोलंदाजी करतात. ख्रिस मॉरिस चांगली फलंदाजी देखील करू शकतो. पंजाब संघाची धुरा केएल राहुलकडे आहे. तर राजस्थान संघाने संजू सॅमसन याच्याकडे नेतृत्व दिले आहे. आयपीएल २०२०मध्ये खराब कामगिरीनंतर राजस्थान संघाने कर्णधार स्टीव्ह स्मिथला रिलीझ केले होते. राहुलचा विचार करता संजूकडे कर्णधारपदाचा फार अनुभव नाही. याचा फायदा पंजाबचा संघ या सामन्यात घेऊ शकतो. संभाव्य संघ- राजस्थान रॉयल्स- जोस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन (कर्णधार), रेयान पराग, शिवम दुबे, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, लियाम लिव्हिगस्टोन, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी पंजाब किंग्ज- केएल राहुल (कर्णधार), मयांक अग्रवाल, ख्रिस गेल/डेव्हिड मलान, प्रभसिमरन सिंह, निकोलस पूरन, शाहरुख खान, दीपक हुडा, झाय रिचर्डसन, रिली मारादीथ, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3t7l5uK
No comments:
Post a Comment