चेन्नई: आयपीएल २०२१च्या पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. आता उद्या १३ एप्रिल रोजी मुंबईची लढत कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध होणार आहे. वाचा- पहिल्या सामन्यातील पराभवानंतर गतविजेत्या मुंबई इंडियन्सने जोरदार तयारी सुरू केली आहे. संघाला विजयाच्या मार्गावर आणण्यासाठी आता कसून सराव सुरू आहे. वाचा- चेन्नईच्या चेपॉक मैदानावर होणाऱ्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. या सामन्यात रोहित शर्माने गोलंदाजी केली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. याचे कारण म्हणजे रोहित शर्माचा एक व्हिडिओ संघाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत रोहित गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. वाचा- बेंगळुरूविरुद्ध झालेल्या पहिल्या लढतीत मुंबईने १५९ धावा केल्या होत्या. या सामन्यात मुंबईला सहाव्या गोलंदाजाची कमतरता जाणवली होती. हार्दिक पंड्याला फिजिओच्या निर्णयामुळे गोलंदाजी दिली जात नाही. त्यामुळे जर रोहित शर्माने गोलंदाजी केली तर आश्चर्य वाटायला नको. वाचा- वाचा- आयपीएलमध्ये रोहित शर्माने १५ विकेट घेतल्या आहेत. ६ धावा देत सहा विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये रोहितच्या नावावर एक हॅटट्रिक देखील आहे. ही हॅटट्रिक रोहितने डेक्कन चार्जर्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध घेतली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uCPu4q
No comments:
Post a Comment