मुंबई: आयपीएल २०२१मधील चौथी लढत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. ही लढत (rajasthan royals) आणि (punjab kings) या दोन संघात होईल. दोन्ही संघांचा आयपीएलच्या १४व्या हंगामातील ही पहिली लढत आहे आणि दोन्ही संघ विजयाने या हंगामाची सुरूवात करण्यास उत्सुक असतील. वाचा- गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील पंजाब संघाची धुरा केएल राहुलकडे आहे. तर राजस्थान संघाने संजू सॅमसन याच्याकडे नेतृत्व दिले आहे. आयपीएल २०२०मध्ये खराब कामगिरीनंतर राजस्थान संघाने कर्णधार स्टीव्ह स्मिथला रिलीझ केले होते. राहुलचा विचार करता संजूकडे कर्णधारपदाचा फार अनुभव नाही. याचा फायदा पंजाबचा संघ या सामन्यात घेऊ शकतो. वाचा- दोन्ही संघ पहिल्याच सामन्यात सर्वोत्तम संघ मैदानात उतरवण्याचा प्रयत्न करतील. पंजाब संघाने या वर्षी त्यांच्या नावात देखील बदल केला आहे. सलामीवीर म्हणून कर्णधार केएल राहुल आणि मयांक अग्रवाल हे फलंदाज दिसतील. गेल्या वर्षी पंजाबने ख्रिस गेलला सुरुवातीच्या काही सामन्यात संधी दिली नव्हती. त्याचा फटका पंजाबला बसला होता. या वर्षी हीच चुक पंजाब पुन्हा करणार नाही. सलामीच्या जोडीने याआधी चांगली कामगिरी केल्याने गेल तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. मधळ्या फळीत प्रभसिमरन सिंह, निकोलस पूरन, शाहरुख खान, दीपक हुडा हे फलंदाज आहेत. तर गोलंदाजीत झाय रिचर्डसन, रिली मारादीथ, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई यांना संघात स्थान मिळू शकते. संघात तिसऱ्या क्रमांकासाठी डेव्हिड मलान देखील आहे. त्यामुळे अंतिम ११ मध्ये गेल किंवा मलान यापैकी कोणाला स्थान दिले जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. वाचा- वाचा- राजस्थान रॉयल्स संघाचा विचार केल्यास फलंदाजीत जोस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, रेयान पराग, शिवम दुबे, राहुल तेवतिया हे फलंदाज आहेत. या शिवाय ख्रिस मॉरिस सारखा आक्रमक खेळाडू देखील अंतिम ११ मध्ये स्थान मिळवू शकतो. गोलंदाजीत जोफ्रा आर्चरचे संघात नसने हा मोठा धक्का आहे. गोलंदाजीची धुरा लियाम लिव्हिगस्टोन, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट आणि कार्तिक त्यागी यांच्यावर असेल. वाचा- संभाव्य संघ- राजस्थान रॉयल्स- जोस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन (कर्णधार), रेयान पराग, शिवम दुबे, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, लियाम लिव्हिगस्टोन, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी पंजाब किंग्ज- केएल राहुल (कर्णधार), मयांक अग्रवाल, ख्रिस गेल/डेव्हिड मलान, प्रभसिमरन सिंह, निकोलस पूरन, शाहरुख खान, दीपक हुडा, झाय रिचर्डसन, रिली मारादीथ, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PVjUAi
No comments:
Post a Comment