Ads

Sunday, April 11, 2021

IPL मध्ये झाला गब्बर विक्रम; शिखर धवनने इतिहास घडवला

मुंबई: () मध्ये विरुद्धच्या सामन्यात ()चा सलामीवीर शिखर धवन()ने स्पर्धेतील ४२वे अर्धशतक पूर्ण केले. शिखरने ५४ चेंडूत ८५ धावा केल्या. या खेळीत त्याने १० चौकार आणि २ षटकार मारले. शिखरने पृथ्वी शॉ सोबत केलेल्या १३६ धावांच्या भागिदारीमुळे दिल्लीला सहज विजय मिळवात आला. वाचा- चेन्नईविरुद्धच्या अर्धशतकी खेळीमुळे शिखरने दोन विक्रम स्वत:च्या नावावर केले. आयपीएलच्या इतिहासात ६०० चौकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला. शिखरच्या नावावर सध्या ६०१ चौकार आहेत. शिखरनंतर सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नावावर ५१० चौकारांची नोंद आहे. वाचा- शिखरने आयपीएल २०२१च्या पहिल्याच लढतीत आणखी एक विक्रम केला. आता तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसरा क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. काल त्याने ८५ धावा करताना वॉर्नरला मागे टाकले. वाचा- वॉर्नरने ५ हजार २५४ धावा केल्या आहेत तर धवनच्या नावावर ५ हजार २८२ धावांची नोंद आहे. याबाबत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. त्याच्या नावावर ५ हजार ९११ तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या सुरेश रैनाच्या नावावर ५ हजार ४२२ धावा आहेत. वाचा- शनिवार झालेल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर ८ चेंडू आणि ७ विकेटनी विजय मिळवला. दिल्लीकडून शिखर शिवाय पृथ्वी शॉने ७२ धावा केल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3s8ape7

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...