मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा पराभव केला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर १८९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य दिले होते. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावा करत विजय पक्का केला. दिल्लीने ८ चेंडू आणि ७ विकेट राखून विजय मिळवला. वाचा- गेल्या हंगामात खराब कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जकडून या हंगामात चाहत्यांना मोठी अपेक्षा आहे. पण पहिल्याच सामन्यात त्यांचा पराभव झाला. त्यात कर्णधार शून्यावर बाद झाल्याने चाहते आणखी निराश झाले. पराभवाच्या या धक्का सोबत धोनीला अजून एक झटका बसला आहे. वाचा- दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतर धोनीला १२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. चेन्नईच्या गोलंदाजांनी धीम्या गतीने गोलंदाजी केल्याबद्दल हा दंड करण्यात आला आहे. चेन्नईने निश्चित केलेल्या वेळेत २० षटके पूर्ण केली नाही, त्यामुळे हा दंड झाला. वाचा- आयपीएलकडून यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार स्लो ओव्हर रेटसंदर्भातील धोनीची ही पहिली चूक आहे. नियमानुसार त्याच्यावर १२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची सुरूवात खराब झाली. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसिस धावा करण्यात अपयशी ठरले. त्यानंतर मोइन अली आणि सुरेश रैना यांनी डाव सावरला. रैनाने धमाकेदार अर्धशतक झळकावले. अखेरच्या षटकात सॅम करन आणि रविंद्र जडेजा यांनी चेन्नईला १८८ अशी मोठी धावसंख्या उभी करून दिली. कर्णधार धोनी शुन्यावर बाद झाला. विजयासाठी आव्हानात्मक धावसंख्या समोर असताना दिल्लीच्या सलामीवीरांनी शानदार सुरूवात केली. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी १३ षटाकत १३६ धावा केल्या. येथेच दिल्लीचा विजय पक्का झाला होता. शिखर आणि पृथ्वी यांनी तुफानी अर्धशतक केले. अखेर कर्णधार पंतने चौकार मारून विजय मिळून दिला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uHlWTc
No comments:
Post a Comment