नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यात कमालीची चुरस पाहायला मिळते. दोन्ही संघात जेव्हा वर्ल्डकपमध्ये सामने होतात तेव्हा ही चुरस आणखी वाढते. पाकिस्तान क्रिकेट संघाला आतापर्यंत एकदाही वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव करता आला नाही. वाचा- भारतीय संघातील माजी जलद गोलंदाज याने रविवारी एक ट्विट केले. यामध्ये त्याने १९९६च्या वर्ल्डकपमध्ये अमिर सोहेलला बोल्ड केल्याचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना प्रसादने राहुल द्रविडने केलेल्या जाहिरातीमधील कॅप्शन दिली आहे. ज्यात तो ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर स्वत:ला इंदिरानगरचा गुड म्हणतो. वाचा- १९९०च्या दशकात प्रसाद आणि जवागल श्रीनाथ हे भारतीय गोलंदाजीची धुरा संभाळत होते. १९९६च्या वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये आणि प्रसाद यांच्यातील लढत आजही सर्वांच्या लक्षात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ८ बाद २८७ धावा केल्या होत्या. नवजोत सिंह सिद्धूने ९३ तर जडेजाने ४५ धावांचे योगदान दिले होते. या सामन्यात वसीम अकरम दुखापतीमुळे संघाबाहेर होता आणि सोहेलकडे नेतृत्व देण्यात आले होते. पाकिस्तानने धमाकेदार सुरुवात केली होती. सोहेर आणि सईद अन्वर यांनी ११ षटकात ८४ धावा केल्या. अन्वर बाद झाल्यानंतर सोहेल मोठे फटके खेळत होता. त्याने प्रसादच्या चेंडूवर एक चौकार मारला आणि इशारा करून पुढील चेंडूवर तेथेच चौकार मारणार असा इशारा केला. त्यानंतरच्या चेंडूवर प्रसादने त्याची बोल्ड घेतली. प्रसादने बोल्ड घेतल्यानंतर ज्या पद्धतीने सोहेलला मैदानाबाहेर जाण्यास सांगितले ती घटना भारतीय चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. वाचा- प्रसादने या घटनेचा फोटो ट्विट केला. त्यावर पाकिस्तानच्या एका चाहत्याने त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पाक चाहता प्रसादला म्हणाला, तुझ्या करिअरमधील ही एकमेव कमावलेली गोष्ट आहे. यावर प्रसादने जे उत्तर दिले त्याने सर्वांची बोलती बंद झाली. वाचा- प्रसाद म्हणाला, नही नजीब भाई. करिअरमधील कमावलेली गोष्टी मी थोडी शिल्लक ठेवली होती. त्यानंतरच्या वर्ल्डकपमध्ये १९९९ साली इंग्लंडमध्ये मी पाकिस्तानविरुद्ध २७ धावा देत ५ विकेट घेतल्या आणि तेव्हा पाकला २२८ धावांचे लक्ष्य पार करता आले नाही. देवाचे आशीर्वाद तुझ्या सोबत असोत. १९९९च्या वर्ल्डकपमध्ये पुन्हा भारताने पाकचा पराभव केला होता. तेव्हा २२८ धावा करणाऱ्या भारताने पाकचा १८० धावांवर ऑल आउट केला होता. पाहा सोहेलची बोल्ड घेतल्याचा व्हिडिओ...
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wOn4qf
No comments:
Post a Comment