Ads

Saturday, April 10, 2021

IPL मध्ये आज गुरु धोनी विरुद्ध शिष्य पंत; वानखेडेवर होणार मॅच

मुंबई: देशातील सर्वाधिक करोना रुग्ण असलेल्या मुंबई शहरात आजपासून आयपीएलच्या सामन्यांना सुरूवात होत आहे. आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी संघ असलेल्या () आणि ( ) या दोन संघात ही लढत होणार आहे. चेन्नईचे नेतृत्व महेंद्र सिंह धोनी तर दिल्लीचे नेतृत्व ऋषभ पंतकडे आहे. म्हणूनच या लढतीकडे गुरू विरुद्ध शिष्य असे पाहिले जात आहे. वाचा- गेल्या सत्रात दिल्ली संघाने सर्वांना धक्का देत अंतिम फेरी गाठली होती. पण त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तेव्हा दिल्लीचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे होते. यावेळी दुखापतीमुळे तो संघाबाहेर आहे आणि नेतृत्व युवा फलंदाज आणि विकेटकिपर पंतकडे देण्यात आहे आहे. या उटल धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने गेल्या वर्षी आयपीएल इतिहासातील सर्वात खराब कामगिरी केली. ते सातव्या क्रमांकावर होते. चेन्नईला प्रथमच प्ले ऑफमध्ये जाता आले नाही. वाचा- आता या वर्षी चेन्नई सुपर किंग्जने जोरदार तयारी केली आहे. पहिल्याच सामन्यात गतउपविजेत्यांना पराभूत करून विजयाने सुरूवात करण्याचा प्रयत्न असेल. चेन्नई संघात अनुभवी सुरेश रैनाचा समावेश झाला आहे. त्याच बरोबर ऋतुराज गायकवाड, फाफ डुप्लेसिस, अंबाती रायडू, सॅम करन, मोइन अली आणि स्वत: धोनी अशी मजबूत फलंदाजी आहे. गोलंदाजीत शार्दुल ठाकूर सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याला साध असेल ती दीपक चाहर आणि रविंद्र जडेजा या दोघांची. वाचा- दिल्ली संघाचा विचार केल्यास भारतीय संघातील अनुभवी शिखर धवन, त्यानंतर पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ आणि पंत ही फलंदाजीची फळी आहे. धवनने गेल्या हंगामात सर्वाधिक ६१८ धावा केल्या होत्या. तर शॉने विजय हजारे स्पर्धेत द्विशतकासह ८२७ धावांचा पाऊस पाडला होता. या शिवाय दिल्लीकडे मार्कस स्टोयेनिस, शिमरोन हेटमायर आणि सॅम बिलिंग्स सारखे अष्टपैलू आहेत. गोलंदाजीत इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, उमेश यादव, ख्रिस वोक्स आणि एनरिक नोजे ही दमदार फळी आहे. करोना क्वारंटाइनच्या नियमामुळे रबाडा आणि नोजे पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसतील. फिरकीपटूमध्ये आर अश्विन आणि अमित मिश्रा यांच्यावर जबाबदारी असेल. अक्षर पटेलला करोना झाल्याने तो उपलब्ध नसेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3d4VZHm

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...