मुंबई: मुंबई इंडियन्सने सलग नऊ वेळा आयपीएलच्या पहिला सामना गमवला आहे. काल आयपीएलच्या १४व्या हंगामात झालेल्या पहिल्या लढतीत बेंगळुरूने त्यांचा २ विकेटनी पराभव केला. ज्या संघाने आयपीएलची सर्वाधिक पाच विजेतेपद मिळवली त्यांना २०१२ पासून एकदाही पहिली मॅच जिंकता आली नाही. वाचा- गतविजेत्या मुंबईचा पहिल्याच सामन्यात पराभव झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला निराशा लपवता आली नाही. बेंगळुरूने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी केली आणि मोठ्या धावसंख्या करणाऱ्या मुंबईला १५९ धावांवर रोखले. प्रथम विराट कोहली ,ग्लेन मॅक्सवेल आणि नंतर एबी डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीच्या जोरावर अखेरच्या चेंडूवर त्यांनी विजय मिळवला. वाचा- सामना झाल्यानंतर आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहितने सांगितले, चॅम्पियनशिप जिंकणे महत्त्वाचे आहे, पहिली मॅच नाही. पण लढत चांगली झाली. आम्ही त्यांना सहजपणे जिंकू दिले नाही. ज्या धावा आम्ही केल्या त्या समाधानकारक नव्हत्या. आम्ही २० धावा कमी केल्या. वाचा- वाचा- आम्ही काही चुका केल्या. पण असे होते. या गोष्टी विसरून पुढे जावे लागले. अशा पिचवर फलंदाजी करणे सोपे नाही. आम्ही पुढील काही सामन्यात यावर विचार करू. अखेरच्या चार षटकात एबीची विकेट घ्याची होती. यामुळेच बुमराह आणि बोल्टकडून गोलंदाजी करून घेतली जात होती. पण त्यात यश आले नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wHJBVB
No comments:
Post a Comment