चेन्नई: आयपीएल २०२१च्या नवव्या लढतीत आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. या लढतीत मुंबईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वाचा- मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरूवात कर्णधार आणि क्विंटन डी कॉक यांनी केली. या दोघांनी सुरुवातीला धमाकेदार फलंदाजी केली. रोहित आणि डी कॉक या जोडीने पाच षटकात ४८ धावा काढल्या होत्या. या चांगल्या सुरुवातीनंतर रोहित शर्मा २५ चेंडूत ३२ धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले. वाचा- रोहितला मोठी धावसंख्या करता आली नसली तरी त्याने एक विक्रम स्वत:च्या नावावर केला. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू होण्याचा मान रोहितने मिळवला. रोहितने याबाबत धोनीला मागे टाकले. त्याने मुजीब उर रहमानच्या षटाक पाचव्या चेंडूवर षटकार मारून चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. धोनीने आयपीएलमध्ये २१६ षटकार मारले आहेत. त्यानंतर भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर डीप मीड विकेटच्या दिशेने षटकार मारून त्याने धोनीला मागे टाकले. वाचा- आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ३५१ षटकार मारले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्स असून त्याने २३७ षटकार मारले आहेत. तर रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने २० षटकात ५ बाद १५० धावा केल्या. डी कॉकने सर्वाधिक ४० तर कायरन पोलार्डने २२ चेंडूत ३५ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RzCDSi
No comments:
Post a Comment