मुंबई: () मध्ये शुक्रवारी १६ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज()ने पंजाब किंग्जवर ६ विकेटनी विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईने शानदार गोलंदाजी करत पंजाबला फक्त १०६ धावात रोखले. त्यानंतर १६व्या षटकात सहज विजय मिळवला. चेन्नईकडून दीपक चहरने धमाकेदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकात १३ धावा देत चार विकेट घेतल्या. वाचा- ... चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएल २०२१च्या हंगामातील पहिलाच विजय ठरला आहे. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांचा पराभव झाला होता. या सामन्यातील विजयानंतर चेन्नईने जोरदार पार्टी केली. आयपीएलमधील या पहिल्या विजयाचा इतका जल्लोष करण्याचे कारण देखील तितके खास आहे. वाचा- पंजाब किंग्जविरुद्धचा सामना हा चेन्नईचा कर्णधार ()चा सीएसकेकडूनचा २००वा सामना होता. या सामन्यात विजय मिळवून संघाने त्याला खास अशी भेट दिली. सामना झाल्यानंतर धोनीने २००व्या सामन्यातील विजय संघातील सहकाऱ्यांसोबत साजरा केला. सीएसकेचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्या सोबत धोनीने केक कापला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- चेन्नईने पंजाब विरुद्ध शानदार कामगिरी केली. दीपक चहरने पंजाबच्या आघाडीच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले. त्याच्या घातक गोलंदाजीने पंजाबची अवस्था ५ बाद २६ अशी झाली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32lbBAb
No comments:
Post a Comment