चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील () विरुद्धच्या लढतीत मुंबई इंडियन्स( )ने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १५० धावा केल्या. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ४० तर कायरन पोलार्डने ३५ धावा केल्या. चांगल्या सुरुवातीनंतर देखील मुंबईला मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले. वाचा- हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी मुंबईला धमाकेदार सुरूवात करून दिली. या दोघांनी ५ षटाकत ४८ धावा केल्या. पण सातव्या षटकात विजय शंकरने रोहित शर्माला ३२ धावांवर बाद केले. त्याने २५ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव १० धावांवर बाद झाला. तर जम बसलेला सलामीवीर डी कॉक ४० धावांवर माघारी परतला. वाचा- मधळ्या फळीतील इशान किशनला आज धावाच करता आल्या नाहीत. त्याने २१ चेंडूत फक्त १२ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिकला पुन्हा एकदा अपयश आले. तो फक्त ७ धावा करू शकला. अखेरच्या काही षटकात कायरन पोलार्डने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला २० षटकात ५ बाद १५० पर्यंत मजल मारता आली. पोलार्डने २२ चेंडूत ३ षटकार आणि १ चौकारासह नाबाद ३५ धावा केल्या. वाचा- हैदराबादकडून विजय शंकरने २ तर मुजिबने दोन विकेट घेतल्या. खलिद अहमदने एक विकेट घेतली. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीतील फलंदाजांना पुन्हा एकदा धावा करण्यात अपयश आले. वाचा- ...
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3x6gT0y
No comments:
Post a Comment