मुंबई: आयपीएलचा १४वा हंगाम उद्यापासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिली मॅच होण्याआधी गतविजेते मुंबई इंडियन्ससह अन्य तीन संघांना मोठा झटका बसला आहे. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा झाली आहे. हा संघ जाहीर झाल्यामुळे आयपीएलमधील संघांना झटका बसला आहे. कसोटी संघात ज्या खेळाडूंची निवड झाली आहे त्यापैकी चार खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. वाचा- या चार खेळाडूंना राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी आयपीएल स्पर्धा सोडून जावे लागले. विशेष म्हणजे ही खेळाडू अशा वेळी स्पर्धा सोडून जाणार आहेत जेव्हा ती निर्णायक ठिकाणी पोहोचली असेल. वाचा- इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी २ जूनपासून सुरू होणार आहे. ही कसोटी लॉर्ड्सवर होईल. तर दुसरी कसोटी १० जून पासून एजबेस्टनवर खेळवली जाणार आहे. इंग्लंडमधील करोना नियमानुसार भारतातून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला १० दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागतो. याचा अर्थ मालिका सुरू होण्याच्या १२ ते १५ दिवस आधी खेळाडूंना इंग्लंडमध्ये पोहोचावे लागेल. जर त्यांना बबल टू बबल ट्रान्सफर केले तर हा कालावधी कमी होईल. दुसरीकडे आयपीएलची फायनल ३० मे रोजी होणार आहे. वाचा- कोणते खेळाडू जाणार स्पर्धा सोडून न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन हा सनरायजर्स हैदराबादचा मुख्य खेळाडू आहे. ट्रेंट बोल्ट हा मुंबई इंडियन्सचा, कायल जेमिसन हा विराट कोहीलच्या तर मिशेल सेंटनर हा चेन्नई सुपर किंग्जसाठीचा महत्त्वाचा खेळाडू आहे. वाचा- ... इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला दोन वेळा करोना चाचणी करावी लागते आणि १० दिवस क्वारंटाइन व्हावे लागते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dN4gie
No comments:
Post a Comment