मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर करोना मुक्त झाला आहे. गुरुवारी सचिनला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून याची माहिती स्वत: सचिनने सोशल मीडियावरून दिली आहे. वाचा- गेल्या महिन्यात झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजनंतर सचिनला करोना झाला होता. याची माहिती त्याने सोशल मीडियावरून दिली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून सचिनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता सचिन काही दिवस घरीच क्वारंटाइन असणार आहे. वाचा- सचिनला २७ मार्चला झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर दोन एप्रिल रोजी तो रुग्णालयात दाखल झाला होता. वाचा- मी रुग्णालयातून घरी पोहोचला आहे आणि सर्वांपासून दूर थांबलोय काही दिवसा आराम करेन. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी मनापासून आभार व्यक्त करतो, असे सचिनने पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याने रुग्णालातील कर्मचाऱ्यांचे देखील आभार व्यक्त केले. ज्यांनी माझी खुप चांगल्या पद्धतीने देखभाल केली आणि या अवघड परिस्थितीत गेल्या एक वर्षापासून ते काम करत आहे. वाचा- रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजनंतर सचिनसह चार भारतीय क्रिकेटपटूंना करोनाची लागण झाली होती. भारताने या मालिकेत अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून विजेचेपद मिळवले होते. सचिननंतर युसूफ पठाण, एस बद्रीनाथ आणि इरफान पठाण यांना करोनाची लागण झाली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fZIzOV
No comments:
Post a Comment