चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामात आज सुपर संडे आहे. आज हा हंगामातील पहिली डबल हेडर होणार असून यातील पहिला सामना विरुद्ध यांच्यात होणार आहे. वाचा- ... विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीने सलग दोन लढतीत विजय मिळवला आहे. ते चार गुणांसह गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर आहेत. तर कोलकाताने दोन पैकी एकात विजय आणि दुसऱ्या लढतीत पराभव स्विकारला आहे. वाचा- ... आयपीएलमध्ये दोन्ही संघात आतापर्यंत २६ मॅच झाल्या आहेत त्यापैकी कोलकाता १४ तर आरसीबीने १२ लढती जिंकल्या आहेत. दोघात गेल्या पाच लढतीचा विचार केल्यास आरसीबीने ३ तर कोलकाताने दोन लढती जिंकल्या आहेत. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये झालेल्या साखळी फेरीतील दोन लढतीत आरसीबीने कोलकातावर विजय मिळवला होता. त्या दोन्ही लढतीत कोलकाताची कामगिरी निराशजनक झाली होती. वाचा- गेल्या हंगामातील पहिल्या लढतीत आरसीबीने दोन बाद १९४ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल कोलकाताला ११२ धावा करता आल्या. तर दुसऱ्या लढतीत आरसीबीने विजयासाठीचे ८५ धावांचे लक्ष्य १३.३ षटकात पार केले होते. वाचा- डबल हेडलमधील आजची दुसरी लढत मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. ही लढत दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होईल. विकेटकिपर आणि कर्णधार ऋषभ पंत विरुद्ध केएल राहुल अशी ही लढत असेल. या दोन्ही संघांनी दोन लढतीत एक विजय आणि एक पराभव स्विकारला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QxcSl9
No comments:
Post a Comment