चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील नवव्या लढतीत मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर १३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजीकरत मुंबईने हैदराबादला १५१ धावांचे आव्हान दिले होते. वाचा- कर्णधार () आणि जॉनी बेयरस्टो यांनी हैदराबादला शानदार सुरूवात करून दिली होती. ७.२ षटकात ६७ धावा करणाऱ्या या दोघांनी विजयाचा पाया रचला होता. बेयरस्टो ४३ धावांवर हिटविकेट झाल्यानंतर मनिष पांडे २ धावाकरून माघारी परतला. वॉर्नर मैदानावर होता त्यामुळे मुंबई इंडियन्सचे टेन्शन कायम होते. वाचा- १२व्या षटकात एक धाव घेण्याच्या प्रयत्नात वॉर्नर धावबाद झाला. ()ने एक अफलातून थ्रो केला आणि वॉर्नरला माघारी परतावे लागले. हार्दिकचा हा थ्रो इतका जबरदस्त होता की वॉर्नर तिसऱ्या अंपायरच्या निर्णयाची वाट पाहिली नाही. वॉर्नरने ३४ चेंडूत ३६ धावा केल्या. १२व्या षटकात पोलार्डच्या चेंडूवर विराट सिंहने ऑफ साइडला चेंडू मारला. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिकच्या फिटनेस समोर वॉर्नर टिकला नाही. त्याने रॉकटेच्या वेगाने चेंडू विकेटवर थेट मारला. वाचा- हार्दिकने वॉर्नरला धावबाद केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. वॉर्नरच्या विकेटनंतर हैदराबादच्या हातातून सामना निसटला. त्याच्या विकेटनंतर हैदराबादच्या एकाही फलंदाजाला धावा करता आल्या नाहीत. वॉर्नर बाद झाला तेव्हा ११.३ षटकात त्यांनी ३ बाद ९० धावा केल्या होत्या आणि १९.४ षटकात त्यांचा १३७ वर ऑलआउट झाला. वाचा- या सामन्यात हार्दिकने फक्त वॉर्नरला नाही तर अब्दुल समदला देखील अशाच प्रकारे थ्रो करत धावबाद केले. या दोन्ही धावबाद मुळे हार्दिकचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. हार्दिकने धावबाद केलेले दोन्ही व्हिडिओ पाहण्यासाठी .
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eaZr2n
No comments:
Post a Comment