मुंबई : पहिल्या सामन्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची चिंता मिटली आहे. कारण आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वीच धोनीला संघासाठी एक तगडा खेळाडू मिळाला आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज जोश हॅझेलवूडने आपण यावर्षी आयपीएल खेळणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर चेन्नईच्या संघाने दोन आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना यासाठी विचारणा केली होती. या दोघांनीही आम्ही खेळणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे धोनीची चिंता वाढली होती. पण आता जोशऐवजी एक दमदार वेगवान गोलंदाज चेन्नईच्या संघाला मिळाला आहे. जोश हॅझेलवूडऐवजी चेन्नई संघात ऑस्ट्रेलियाचाच वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फची निवड करण्यात आली आहे. डावखुऱ्या बेहरेनडॉर्फला ११ वनडे आणि सात आंतरराष्ट्रीय टी-२०चा अनुभव आहे. याआधी बेहरेनडॉर्फ २०१९मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. त्यामुळे आता एक चांगला वेगवान गोलंदाज संघात आल्यामुळे धोनीची चिंता मिटलेली आहे. त्यामुळे आता जेसन चेन्नईकडून खेळताना कशी कामगिरी करतो, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष नक्कीच लागलेले असेल. चेन्नई सुपर किंग्जने यावर्षी जोरदार तयारी केली आहे. पहिल्याच सामन्यात गतउपविजेत्यांना पराभूत करून विजयाने सुरूवात करण्याचा प्रयत्न असेल. चेन्नई संघात अनुभवी सुरेश रैनाचा समावेश झाला आहे. त्याच बरोबर ऋतुराज गायकवाड, फाफ डुप्लेसिस, अंबाती रायडू, सॅम करन, मोइन अली आणि स्वत: धोनी अशी मजबूत फलंदाजी आहे. गोलंदाजीत शार्दुल ठाकूर सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याला साध असेल ती दीपक चाहर आणि रविंद्र जडेजा या दोघांची. त्यामुळे चेन्नईचा संघ आता चांगलाच समतोल दिसत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने गेल्या वर्षी आयपीएल इतिहासातील सर्वात खराब कामगिरी केली. ते सातव्या क्रमांकावर होते. चेन्नईला प्रथमच प्ले ऑफमध्ये जाता आले नाही. चेन्नईचे नेतृत्व महेंद्र सिंह धोनी तर दिल्लीचे नेतृत्व ऋषभ पंतकडे आहे. म्हणूनच या लढतीकडे गुरू विरुद्ध शिष्य असे पाहिले जात आहे. त्यामुळे आता या लढतीमध्ये गुरु धोनी बाजी मारणार की पंत आपल्या गुरुला पराभूत करणार, याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mCb5ag
No comments:
Post a Comment