नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामातील दुसरी लढत आज आणि यांच्यात होणार आहे. ही लढत अनुभवी महेंद्र सिंह धोनी आणि युवा ऋषभ पंत यांच्यात असेल. या सामन्यात चेन्नईचा संघ मैदानात उतरण्याआधी सर्वांच्या मनात एकच प्रश्न असेल आणि तो म्हणजे चेतेश्वर पुजाराला अंतिम ११ मध्ये संधी मिळेल का? दिल्ली विरुद्धच्या सामन्यात तो चेन्नईकडून पदार्पण करेल का? वाचा- गेल्या हंगामात चेन्नईला अपेक्षे प्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्यांना साखळी फेरीतून बाहेर व्हावे लागले. दुसऱ्या बाजूला दिल्लीने गेल्या वर्षी अंतिम फेरीत धडक मारली होती. आता हे दोन्ही संघ पुन्हा जोरदार तयारी करून स्पर्धेत उतरले आहेत. वाचा- चेन्नईच्या संघात सलामीची जोडी म्हणून ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मधळ्या फळीत सुरेश रैना परतल्यामुळे मोठी दिलासा मिळाला आहे. त्यानंतर धोनी आणि ब्रावोचा क्रमांक लागतो. ऑलराउंडर म्हणून संघात असलेल्या सॅम करन आणि रविंद्र जडेजा हे फलंदाजीला येतील. हे दोघेही फलंदाजी सोबत गोलंदाजी देखील करू शकतात. वाचा- जलद गोलंदाजांचा विचार केल्यास सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेला शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. त्याला साथ देण्यासाठी दीपक चाहर आणि लुंगी एगिडी असेल. तर फिरकीपटूंमध्ये इमरान ताहिरला अंतिम ११ मध्ये स्थान मिळू शकेल. वाचा- पहिल्या सामन्यासाठी चेन्नईचा संभाव्य संघ ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, सुरेश रैना, महेंद्र सिंह धोनी, डे्वेन ब्राव्हो, सॅम करन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, लुंगी एगिडी, इमरान ताहिर वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wHnm1X
No comments:
Post a Comment