चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामाला सुरूवात झाली आहे. स्पर्धेतील पहिल्याच लढतीत मोठी चुरस पाहायला मिळाली. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात झालेल्या या लढतीत एका खेळाडूने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. वाचा- पहिल्या लढतीत मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत १६० धावांचे आव्हान दिले होते. बेंगळुरूने ते अखेरच्या चेंडूवर पार केले. या सामन्यात RCBचा कर्णधार विराट कोहलीने एक वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ६ हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरलाय. या शिवाय टी-२० मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज आहे. वाचा- विराटने १६८ टी-२० सामन्यात ६ हजार धावा केल्या. याबाबत महेंद्र सिंह धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने टी-२० मध्ये ५ हजार ८७२ धावा केल्या आहेत. तर गौतम गंभीरने कर्णधार म्हणून ४ हजार ४२४ धावा केल्या आहेत. सध्या विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तसेच तो सहा हजार धावा करण्याच्या जवळ पोहोचला आहे. वाचा- मुंबई विरुद्धच्या सामन्यात बेंगळुरूने टॉस जिंकून गोलंदाजी स्विकारली. ख्रिस लीनने ४९ धावांची खेळी केली आणि मुंबईने २० षटकात ९ बाद १५९ धावा केल्या. बेंगळुरूकडून हर्षल पटेलने ५ विकेट घेतल्या. आयपीएल इतिहासात मुंबई विरुद्ध पाच विकेट घेणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्यानंतर एबी डिव्हिलियर्सच्या धमाकेदार खेळीमुळे बेंगळुरूने पहिल्याच सामन्यात विजय मिळून आयपीएल २०२१ची सकारात्मक सुरूवात केली. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RpRUFm
No comments:
Post a Comment