चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील आजच्या (१७ एप्रिल) लढतीला सुरूवात झाली. ( ) आणि ( ) यांच्या लढतीला सुरुवात झाली आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादविरुद्धच्या लढतीत मुंबईने संघात एक बदल केला आहे. तर सलग दोन पराभवानंतर हैदराबादने एक दोन नव्हे तर चार बदल केले आहेत. वाचा- या हंगामात पहिल्या लढतीत मुंबईचा बेंगळुरूने पराभव केला होता. दुसऱ्या लढतीत त्यांनी एक बदल केला आणि क्विंटन डी कॉकला संघात घेतले. आज तिसऱ्या लढतीत मुंबईने आणखी एक बदल केला. जेनसनच्या जागी अॅडम मिलने याला संघात स्थान दिले आहे. अॅडम मिलनेचे हे आयपीएलमधील मुंबई इंडियन्सकडूनचे पदार्पण आहे. वाचा- असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ
वाचा- डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा पहिल्या दोन लढतीत पराभव झाला आहे. अखेरच्या लढतीत तर त्यांना १५० ही धावसंख्या पार करता आली नव्हती. यामुळे आज मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात हैदराबादने एक दोन नव्हे तर चार बदल केले आहे. हैदराबादने या सामन्यासाठी संघात मुजीब उर रहमान, खलील अहमद, अभिषेक शर्मा आणि विराट सिंग यांना स्थान दिले आहे. असा आहे हैदराबादचा संघ 
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ajwa4s
No comments:
Post a Comment