मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील दुसरी लढत आज होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर होणाऱ्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होईल. या सामन्याच्या आधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक यांनी एक ट्विट केले आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खांद्याला दुखापत झाल्याने दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर या वर्षी आयपीएल खेळणार नाही. त्याच्या जागी पंतकडे दिल्लीची धुरा सोपवण्यात आली आहे. भारतीय संघात धोनीची जागा पंतने घेतली आहे. सुरुवातीच्या काळात धोनीच्या मार्गदर्शनाखाली पंत होता. वाचा- आता आयपीएलमध्ये गुरु आणि शिष्य यांची लढत पाहायला मिळणार आहे. या सामन्याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. शास्त्रींनी या लढती आधी ट्विट केले असून ते म्हणतात, गुरु विरुद्ध शिष्य. आज खुप मजा येणार. स्टंप माइक नक्की ऐका. वाचा- धोनी स्टंपच्या मागे मजेशीर कॉमेंट्स करत असतो. पंत देखील यात आघाडीवर आहे. तो सातत्याने स्टंप माइकवर बोलत संघाचा उत्साह वाढवत असतो. यामुळे प्रेक्षकांचे देखील मनोरंजन होत असते. वाचा- क्रिकेटमध्ये आज प्रथमच धोनी आणि पंत नाणेफेकीसाठी एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे आजची लढत चुरशीची होणार यात शंका नाही. माझ्यासाठी ही खास गोष्ट आहे. मी धोनीकडून खुप काही गोष्टी शिकल्या आहेत. मोठा अनुभव घेतला आहे. आता त्याच अनुभवाच्या जोरावर मैदानात खेळणार आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करणार, असे पंत म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3s5UU6y
No comments:
Post a Comment