मुंबई : दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला राजस्थान रॉयल्सकडून अखेरच्या सामन्यात पारभव पत्करावा लागला. हा सामना दिल्ली जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण त्यांच्या तोंडातून विजयाचा घास ख्रिस मॉर्सने हिरावला. दिल्लीच्या पराभवासह गुणतालिकेतही काही बदल झाला आहे. दिल्ली या सामन्यापूर्वी दुसऱ्या स्थानावर होती. त्यामुळे हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याचे त्यांचे स्वप्न होते. पण मॉरिसने अखेरच्या षटकामध्ये त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळाले. त्यामुळे दिल्लीच्या संघाला अव्वल स्थान पटकावता आले नाही. या पराभवानंतर दिल्लीच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांच्या संघाची आता चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. सध्याच्या घडीला दोन विजयांसह विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ हा अव्वल स्थानावर आहे. पण आरसीबीच्या संघापेक्षा रनरेट हा दिल्लीचा अजूनही जास्त आहे. पराभवानंतरही दिल्ली याबाबत अजूनही आरसीबीच्या पुढे आहे. त्यामुळे जर दिल्लीने हा सामना जिंकला असता तर नक्कीच त्यांना अव्वल स्थानावर पोहोचता आले असते. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आता मुंबई इंडियन्सचा संघ आहे. कारण मुंबई इंडियन्सचा संघ दोन सामने खेळला आहे. पहिल्या सामन्यात त्यांना आरसीबीबरोबर पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर केकेआरविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत मुंबईच्या संघाने दुसरे स्थान पटकावले आहे. आता शनिवारी मुंबईचा संघ मैदानात उतरणार असून ते दुसरा सामना जिंकणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. गुणतालिके तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्सचा संघ आहे. राजस्थान रॉयल्सने गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवला आणि आपल्या विजयाचे खाते उघडले. या सामन्यापूर्वी राजस्थानचा संघ हा सहाव्या स्थानावर होता. पण दिल्लीवर विजय मिळवल्यानंतर राजस्थानच्या संघाने पाचवे स्थान पटकावले आहे. आज चेन्नई सुपर किंग्स आणि पंबाज किंग्स यांच्यामध्ये सामना होणार आहे. या सामन्यात कोणता संघ विजय मिळवतो आणि गुणतालिकेत नेमका काय मोठा बदल होतो, याची उत्सुकता नक्कीच दोन्ही संघांच्या चाहत्यांना असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tqKQ9t
No comments:
Post a Comment