मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला पहिल्याच सामन्याच पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात धोनीला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळे जर चेन्नईला दुसरा सामना जिंकायचा असेल तर धोनीनं नेमकं काय करायला हवं, याचा मंत्र भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरने दिला आहे. गंभीरने यावेळी सांगितले की, " जेव्हा कोणतीही व्यक्ती एखाद्या संघाचे नेतृत्व करत असते तेव्हा त्या व्यक्तीने काही गोष्टी करणं गरजेचं असतं. त्यामुळे जर चेन्नईला सामना जिंकायचा असेल तर धोनीने काही बदल करणे गरजेचे आहे, त्याचबरोबर धोनीने काही जबाबदारीही घ्यायला हवी, असं मला तरी वाटतं." गंभीर पुढे म्हणाला की, " एक गोष्ट धोनी आणि चेन्नईसाठी फार महत्वाची आहे आणि ती गोष्ट म्हणजे संघात बदल व्हायला हवा. माझ्यामते धोनीने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ नये. धोनी जर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला तर नक्कीच संघात फरक पडू शकतो, असं मला वाटतं. कारण आपला कर्णधार मैदानात कसा लढतो आहे, हे पाहून खेळाडूंचा उत्साह वाढू शकतो. त्याचबरोबर धोनी यावेळी चांगली कामगिरी करत त्यांच्यासमोर एक आर्दशही निर्माण करू शकतो. त्यामुळे माझ्यासाठी तर धोनीने सातव्या क्रमांकावर फलंदाजी न करता थोडं वर नक्कीच यायला हवं." गंभीर पुढे म्हणाला की, " जो धोनी आपण ५-६ वर्षांपूर्वी पाहिला आहे तसा तो नक्कीच राहीलेला नाही. आता मैदानात उतरल्यावर धोनी लगेचच फटकेबाजी करेल, हे चित्र पाहायला मिळणार नाही. त्यामुळे जर धोनीला स्थिरस्थावर होऊन मोठे फटकेबाजी करायची असेल तर नक्कीच त्याने चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवं. कारण धोनीला सध्याच्या घडीला तरी सातव्या स्थानावर फलंदाजीला येऊन काहीच फायदा होणार नाही." आज चेन्नई सुपर किंग्स आणि पंबाज किंग्स यांच्यामध्ये सामना होणार आहे. या सामन्यात कोणता संघ विजय मिळवतो आणि गुणतालिकेत नेमका काय मोठा बदल होतो, याची उत्सुकता नक्कीच पंजाबच्या संघाला असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uSPk9e
No comments:
Post a Comment