Ads

Friday, April 16, 2021

IPL 2021 : मुंबई इंडियन्सला तिसरा सामना जिंकायचा असेल तर त्यांनी ही मोठी चुक सुधारावीच लागेल, पाहा कोणती...

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या संघाने गेल्या दोन सामन्यात एकच मोठी चुक केली असून त्याचा मोठा फटका त्यांना बसला आहे. आता शनिवारी मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना सनरायझर्स हैदराबादबरोबर होणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ ही मोठी चुक सुधारणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाबरोबर झाला. पहिल्या सामन्यात मुंबईचा संघ ३ बाद १०५ अशा सुस्थितीत होता. त्यानंतर मुंबईची मधली फळी गडगडली आणि मुंबईला ९ बाद १५९ अशी धावसंख्या उभारता आली. या गोष्टीचा अर्थ असा की, मुंबईने आपले सहा फलंदाज फक्त ५४ धावांमध्ये गमावले. त्यामुळेच मुंबईला पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळेच आरसीबीने हा सामना जिंकला आणि मुंबईला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाची मधली फळी अपयशी ठरली होती. मुंबई इंडियन्सने केकेआरचाबरोबरचा दुसरा सामना जिंकला. पण दुसऱ्या सामन्यातही त्यांच्याकडून तीच चुक पाहायला मिळाली. दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा १५.२ षटकांमध्ये जेव्हा बाद झाला तेव्हा मुंबई इंडियन्सची ४ बाद ११५ अशी स्थिती होती. त्यानंतर जवळपास पाच षटके मुंबई इंडियन्सकडे शिल्लक होती. यावेळी २८ चेंडूंमध्ये मुंबई इंडियन्सला फक्त ३७ धावा करता आल्या, पण त्यासाठी या संघाला तब्बल सहा फलंदाजांना गमवावे लागले. मुंबई इंडियन्सचा संघ यावेळी १५२ धावांमध्ये ऑलआऊट झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये इशान किशन, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या हे फलंदाजीमध्ये अपयशी ठरले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये या चौघानांही चांगली फलंदाजी करता आलेली नाही आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभारता नाही, त्यांना १६०च्या पुढे धावा करता आलेल्या नाहीत. या गोष्टीचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश. त्यामुळे जर मुंबई इंडियन्सला हैदराबादला पराभूत करुन तिसरा सामना जिंकायचा असेल तर त्यांना मधल्या फळीतील फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारणे गरजेचे असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dmmV5u

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...