चेन्नई : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये आज आयपीएलचा सामना रंगणार आहे. पण या सामन्यापूर्वी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. मुंबई आणि कोलकाता यांच्यातील सामन्यामध्ये साराचे महत्व आता वाढलले दिसत आहे. पण नेमकी गोष्ट आहे तरी काय, पाहा... मुंबई इंडियन्सच्या संघात आता साराचा भाऊ आणि वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला संधी मिळालेली आहे. पण दुसरीकडे कोलकाताच्या संघामध्ये शुभमन गिल असून तो साराचा चांगला मित्र असल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. त्यामुळे या सामन्यात सारा आपल्या भावला आणि मुंबई इंडियन्सला पाठिंबा देणार की गिल आणि कोलकाताच्या विजयाची प्रार्थना करणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आता चाहते साराच्या नावाने बरेच मिम्स बनवत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सारा आणि शुभमन यांचे प्रेमप्रकरण सुरु असल्याची जोरदार चर्चा होती. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे काही चाहते शुभमनला साराचा प्रियकरही समजत आहे. पण या नात्याबद्दल सारा आणि शुभमन यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कोणीतीही माहिती दिलेली नाही. पण सोशल मीडियावर मात्र चाहत्यांनी सारा या सामन्यात नेमका कोणाला सपोर्ट करणार, याबाबत जोरदार चर्चा करत आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ विजयी ठरेल, याची उत्सुकताही चाहत्यांना असेल. केकेआरपुढे मुंबई इंडियन्सचेच पारडे जडया दोन्ही संघातील आतापर्यंतची कामगिरी पाहता मुंबई इंडियन्स अधिक मजबूत दिसतो. या दोन्ही संघात गेल्या १२ लढतीत कोलकाताला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला. आयपीएलच्या सुरुवातीपासून दोन्ही संघात २७ लढती झाल्या असून त्यात मुंबईने २१ सामन्यात विजय मिळवला आहे. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये मुंबईने साखळी फेरीत कोलकाताविरुद्धच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला. दोन्ही संघातील गेल्या पाच सामन्यात कोलकाताने फक्त एकात विजय मिळवला आहे. यामुळे आजच्या लढतीत देखील मुंबईचे पारडे जड असणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sdRX3G
No comments:
Post a Comment