दुबई: भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही महिन्यात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मासिक पुरस्कारात भारतीय खेळाडूंनी सलग तीन महिन्यात बाजी मारली आहे. वाचा- भारतीय संघातील आघाडीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने मार्च महिन्यात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेत शानदार कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीमुळे आयसीसीच्या मार्च महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी त्याची निवड झाली आहे. त्याने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत ४.५६च्या सरासरीने सहा तर पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ६.३८च्या सरासरीने चार विकेट घेतल्या होत्या. वाचा- मोठ्या कालावधीच्या ब्रेकनंतर आणि दुखापतीतून सावरल्यानंतर भारताकडून खेळण्याचा आनंद आहे. या काळात मी फिटनेस आणि तंत्रावर काम केले. भारताकडून पुन्हा एकदा खेळण्यास सुरूवात केल्यानंतर आनंद आहे. या काळात ज्यांनी मला साथ दिली त्या सर्वांचा मी आभारी आहे. आयसीसी व्होटिंग अकादमी आणि मार्च महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ज्यांनी मला मत दिले त्यासर्वांचे मी आभार मानतो, असे भुवनेश्वरने म्हटले. वाचा- वाचा- आयसीसीने प्रत्येक महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू निवडण्यास या वर्षी सुरूवात केली. जानेवारीपासून सुरू झालेल्या हा पुरस्कार मिळवणारा भुवी तिसरा भारतीय खेळाडू आहे. याआधी जानेवारी महिन्यात ऋषभ पंतने आणि फेब्रुवारी महिन्यात अश्विनने हा पुरस्कार जिंकला होता. वाचा- मार्च महिन्यात भुवी सोबत अफगाणिस्तानचा राशिद खान आणि झिम्बाब्वेचा सीन विलियम्स या पुरस्काराच्या शर्यतीत होता. भुवी दुखापतीमुळे दीड वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नाही. त्यानंतर त्याने शानदार कमबॅक केले. पॉवर प्ले आणि डेथ ओव्हरमध्ये त्याने चांगली कामगिरी केली असे व्होटिंग अकादमीचे सदस्य व्हीव्हीएस लक्ष्मणने म्हटले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3db9LbA
No comments:
Post a Comment