चेन्नई: आयपीएलच्या पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने मुंबई इंडियन्सचा २ विकेटनी पराभव केला पहिल्या विजयाची नोंद केली. मुंबईने प्रथम फलंदाजी करत ९ बाद १५९ धावा केल्या होत्या. विजयाचे लक्ष्य आरसीबीने अखेरच्या चेंडूवर पार केले. वाचा- ... या सामन्यात पाच विकेट घेऊन विक्रम करणाऱ्या बेंगळुरूच्या हर्षल पटेलला सामनावीर पुरस्कार मिळाला. तर एबी डिव्हिलियर्सने ४८ धावा केल्या. मॅक्सवेलने ३९ तर कर्णधार विराट कोहलीने ३३ धावांचे योगदान दिले. मुंबईला या सामन्यात विजय मिळवता आला नसला तरी मॅच सुरू असताना सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ शेअर झाला जो पाहिल्यानंतर सर्वजण हैराण झाले. वाचा- या सामन्यात जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा मुंबई इंडियन्सच्या एका चाहत्याने टीव्हीवर त्याला पाहताच रोहितची आरती करण्यास सुरूवात केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वाचा- वाचा- पहिल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा १९ धावांवर धावबाद झाला. रोहितला मोठी धाव संख्या करता आली नाही. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. ख्रिस लीन आणि त्याच्या झालेल्या चुकीच्या कॉलमुळे रोहित बाद झाला. पहिल्या पराभवानंतर रोहित फार टेंन्शनमध्ये नाही. मुंबईला गेल्या ९ वर्षात एकदाही पहिला सामना जिंकता आला नाही. सामना झाल्यावर रोहितने चॅम्पियनशिप जिंकणे महत्त्वाचे आहे, पहिली मॅच नाही, असे सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wDmk74
No comments:
Post a Comment