मुंबई : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात एक विक्रम रचण्याची सुवर्णसंधी आहे. आयपीएलमध्ये हा विक्रम करणारा धोनी हा पहिलाच क्रिकेटपटू ठरणार आहे. आतापर्यंत धोनीने चेन्नईच्या नेतृत्वाबरोबरच यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळली आहे. आतापर्यंत धोनी यष्टीरक्षण करताना १४८ बळी मिळवले आहेत. त्यामुळे जर आज धोनीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात जर दोन बळी मिलवले तर त्याचे १५० बळी पूर्ण होतील. त्याचबरोबर आयपीएलमध्ये १५० बळी पटकावणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरणार आहे. आतापर्यंत धोनीच्याच नावावर आयपीएलमध्ये यष्टीरक्षण करताना सर्वाधिक बळी आहेत. धोनीनंतर यावेळी क्रमांक लागतो तो केकेआरचा माजी कर्णधार दिनेश कार्तिकचा. कारण कार्तिकने आयपीएलमध्ये आतापर्यंत यष्टीरक्षण करताना १४० बळी टिपले आहेत. या यादीमध्ये तिसरा क्रमांक हा रॉबिन उथप्पाचा आहे, त्याच्या नावावर ९० बळी आहेत. पण आता उथप्पा हा चेन्नईच्या संघात आल्यामुळेच त्याला यष्टीरक्षणाची संधी मिळणार नाही, असेच दिसत आहे. या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर पार्थिव पटेल आहे. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये पटेलने यष्टीरक्षण करताना ८१ बळी मिळवले होते. या यादीत पाचव्या स्थानावर आहे तो वृद्धिमान साहा. आतापर्यंत साहाने यष्टीरक्षण करताना ७६ बळी मिळवले आहेत. त्यामुळे धोनी आणि कार्तिक यांच्यामध्ये चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळू शकते. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची चिंता मिटली आहे. कारण आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वीच धोनीला संघासाठी एक तगडा खेळाडू मिळाला आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज जोश हॅझेलवूडने आपण यावर्षी आयपीएल खेळणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर चेन्नईच्या संघाने दोन आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना यासाठी विचारणा केली होती. या दोघांनीही आम्ही खेळणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे धोनीची चिंता वाढली होती. पण आता जोशऐवजी एक दमदार वेगवान गोलंदाज चेन्नईच्या संघाला मिळाला आहे. जोश हॅझेलवूडऐवजी चेन्नई संघात ऑस्ट्रेलियाचाच वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फची निवड करण्यात आली आहे. डावखुऱ्या बेहरेनडॉर्फला ११ वनडे आणि सात आंतरराष्ट्रीय टी-२०चा अनुभव आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dQa9eL
No comments:
Post a Comment