मुंबई: ऑस्ट्रेलियात खराब कामगिरी केल्यामुळे भारतीय संघातील सलामीवीर पृथ्वी शॉला बाहेर बसवण्यात आले होते. शनिवारी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना पृथ्वीने चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांची धुलाई केली. पृथ्वीच्या स्फोटक फलंदाजीमुळे दिल्लीचा विजय सोपा झाला. वाचा- आयपीएलच्या आधी पृथ्वीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये चार शतक झळकावली होती. पण एवढ्या साऱ्या कामगिरीनंतर देखील पृथ्वी भारतीय संघाकडून खेळण्याचा विचार करत नाही. वाचा- सामना झाल्यानंतर पृथ्वी म्हणाला, मी सध्या भारतीय संघाकडून खेळण्याचा विचार करत नाही. कारण संघातून बाहेर काढले हे खुपच निराश करणारे होते. पण मी त्यातून बाहेर पडलो. मी ही गोष्टी मान्य केली की माझ्या फलंदाजी करण्याच्या पद्धतीत दोष आहे. प्रथम त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. यावर काम करून सुधारणा केली पाहिजे. यासाठी मी कोणतेही कारण देऊ शकत नाही. वाचा- चेन्नईविरुद्धच्या सामन्यात आम्ही जे नियोजन केले होते त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी देखील केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर जेव्हा भारतीय संघातून वगळण्यात आले तेव्हा मी प्रवीण आमरे सरांकडे गेलो. त्यांच्यासोबत फलंदाजीसंदर्भात चर्चा केली आणि देशांतर्गत क्रिकेट खेळलो. याचा फायदा मला झाला. मी आनंदी आहे की चांगली फलंदाजी केली. माझ्या फलंदाजीत जी काही कमतरता आहे त्यावर काम करत आहे, असे पृथ्वी म्हणाला. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wHkTEV
No comments:
Post a Comment