Ads

Sunday, April 11, 2021

राहुल द्रविड महेंद्रसिंग धोनीवर जबरदस्त भडकला होता, वीरेंद्र सेहवागने सांगितला खास किस्सा

मुंबई : राहुल द्रविड हा शांत स्वभावाचा आहे, हे आतापर्यंत आपण सर्वांनीच पाहिले आहे. त्यामुळे तो कोणावर भडकू शकतो, असे वाटत नाही. पण तरीही द्रविड एकदा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीवर चांगलाच भडकला होता आणि याबाबताच किस्सा आता भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सांगितला आहे. सेगवागने यावेळी सांगितले की, " ही गोष्ट भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यामधील आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्यांमध्ये तणावाचे वातावरण असते. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडू शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो. पाकिस्तानविरुद्ध आम्ही खेळत असताना द्रविड एकदा धोनीवर चांगलाच भडकल्याचे मी पाहिले आहे." सेहवाग पुढे म्हणाला की, " पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी फलंदाजी करत होता. त्यावेळी एक चुकीटा फटका मारून धोनी बाद झाला होता. त्यानंतर द्रविड हा धोनीवर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला होता. 'तु असं क्रिकेट खेळतोस का, तुला या सामन्यात विजयावर शिक्कामोर्तब करायला हवे होते,' असे द्रविड रागाच्या भरात धोनीला म्हणाला होता." धोनी हा मॅचविनर असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. पण धोनी जेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये नवखा होता, त्यावेळी त्याच्याकडून बऱ्याच चुका झाल्या होत्या. या चुकांमधून शिकत धोनी हा एक चांगला फिनीशर होऊ शकला होता. त्याचबरोबर द्रविडसारख्या अनुभवी खेळाडूंनी त्याचे योग्यवेळी कान टोचले आणि त्याचा फायदाही धोनीला त्याच्या कारकिर्दीत झाल्याचे पाहायला मिळाले. पण त्यानंतर धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फिनीशर म्हणून ओळखळा जाऊ लागला. महेंद्रसिंग धोनीची आयपीएलमध्ये चिंता वाढली...पहिल्या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीची चिंता वाढलेली आहे. कारण आता दुसऱ्या सामन्यामध्ये चेन्नईचे दोन खेळाडू खेळू शकणार नाहीत, असे सघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईची फलंदाजी चांगली झाली होती, पण गोलंदाजांमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे चेन्नईच्या संघाला चांगल्या गोलंदाजांची नितांत गरज आहे. पण संघातील दोन महत्वाचे गोलंदाज आता पंजाब किंग्सबरोबरच्या दुसऱ्या सामन्यात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. फ्लेमिंग यांनी यावेळी सांगितले की, " पंजाब किंग्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात आमच्या संघातील लुंगी एनगिडी आणि जेसन बर्डनहॉर्फ हे खेळू शकणार नाहीत. कारण हे दोन्ही वेगवान गोलंदाज अजूनही संघासाठी उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. एनगिडी हा दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकणर नाही, पण त्यानंतर तो संघासाठी उपलब्ध होऊ शकेल. त्याचबरोबर जोश हेझलवूडही यावेळी संघात नाही. हेझलवूडच्या जागी संघात स्थान देण्यात आलेला जेसनही अजून संघासाठी उपलब्ध होऊ शकलेला नाही."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/326giOs

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...