चेन्नई : मुंबई इंडियन्सच्या हातूव कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धचा सामना जवळपास हातातून निसटला होता. कारण मुंबई इंडियन्सचा संघ १५२ धावांमध्ये सर्वबाद झाला होता. त्यानंतर केकेआरच्या संघाने दमदार फलंदाजी करत ७२ धावांची दमदार सलामी दिली होती. पण त्यानंतरही मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने हार मानली नाही. त्यानंतरही रोहितने चलाखपणे रणनिती रचली आणि मुंबई इंडियन्सला सामना जिंकवून दिला, असंच पाहायला मिळाले. केकेआरचा संघ फलंदाजी करत असताना त्यांन मुंबईच्या वेगवान गोलंदाजांवर चांगलाच प्रहार केला होता. त्यामुळे कर्णधार रोहितने पाचव्या षटकत कृणाल पंड्याच्या हाती चेंडू सोपवला होता. कृणालने त्यानंतर पाचव्या आणि सातव्या षटकामध्ये जास्त धावा दिल्या नाहीत. पण मार्को जॅन्सन आणि कायरन पोलार्ड यांच्या सहाव्या आणि आठव्या षटकामध्ये जास्त धावा गेल्या होत्या. त्यानंतर नवव्या षटकात राहुल चहरला गोलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या बाजूने सामना झुकायला सुरुवात झाली. चहरने आपल्या पहिल्याच षटकात दमदार फलंदाजी करणारा केकेआरचा सलामीवीर शुभमन गिलला बाद केले आणि मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर चहरने केकेआरच्या गोलंदाजांना आपल्याच तालावर नाचवले. चहरने यावेळी चार षटकांमध्ये २७ धावा देत केकेआरच्या चार फलंदाजांना बाद केले. त्याचबरोबर कृणाल पंड्याने केकेआरच्या धावसंख्येला खीळ घातली आणि त्याने चार षटकांमध्ये फक्त १३ धावा देत एक बळीही मिळवला. केकेआरला पाच धक्के दिल्यावर त्याने वेगवान गोलंदाजांना पाचारण केले. फिरकीपटूंची कामगिरी चांगली होत आहे, हे रोहित पाहत होता. त्यामुळे रोहितने यावेळी स्वत:हूनही एक षटक टाकले. त्यामुळे वेगवान गोलंदाज हे जास्त काळ गोलंदाजी करू शकले नाहीत. पण जसप्रीत बुमरा आणि ट्रेंट बोल्ट यांचा उत्तम वापर रोहितने अखेरच्या षटकांमध्ये केला. अखेरच्या षटकामध्ये बोल्टने भेदक मारा करत आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स यांना बाद करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सामना कधीही सोडायचा नाही, त्याला आपल्या बाजूने कसे वळवता येईल, हे रोहितने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिले. त्यामुळेच रोहित हा कसा चाणाक्ष कर्णधार आहे, याचा प्रत्यय सर्वांनाच केकेआरविरुद्धच्या सामन्यात आला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32dcxqr
No comments:
Post a Comment