मुंबई : आयपीएल २०२१ च्या विजेतेपदाचे दावेदार () संघाला आणखी एक धक्का बसला आहे. संघातील मुख्य जलद गोलंदाजाला करोनाची लागण झाली आहे. दिल्ली संघाने आयपीएलच्या १४व्या हंगामात पहिल्याच लढतीत चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत धमाकेदार सुरुवात केली होती. वाचा- दिल्ली कॅपिटल्स संघासाठी या वर्षीचा हंगाम अवघड असल्याचे दिसतय. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. त्यानंतर पहिल्या सामन्याआधी फिरकीपटू आणि ऑलराउंडर अक्षर पटेल याला करोनाची लागण झाली. आता त्यानंतर जलद गोलंदाज ()ला करोना झाला आहे. वाचा- एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार एनरिक नॉर्त्जे नेगेटिव्ह रिपोटसह भारतात दाखल झाला होता. जेव्हा त्याचा क्वारंटाइन कालावधी संपला आणि टेस्ट घेण्यात आली तेव्हा मात्र तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळल. भारतात आल्यावर एनरिक नॉर्त्जे सात दिवस क्वारंटाइनमध्ये होता. वाचा- श्रेयस अय्यरच्या गैरहजेरीत दिल्लाचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. पंतच्या नेतृत्वात पहिल्याच स्पर्धेत त्यांनी चेन्नई सुपर किंग्जचा सात विकेटनी पराभव केला होता. सीएसके विरुद्धच्या सामन्यात एनरिक नॉर्त्जे उपलब्द नव्हता. पण तो त्यानंतरच्या सामन्यासाठी संघात येईल अशी दिल्लीला आशा होती. पण आता करोना पॉझिटिव्ह तो पुढील काही सामने उपलब्ध असणार नाही. वाचा- घेतला आधीच नियमीत कर्णधार नाही त्यात मुख्य खेळाडू संघाबाहेर असल्याने दिल्ली संघाला मोठा झटका बसला आहे. एनरिक नॉर्त्जेच्या जागी संघात ख्रिस वोक्सला स्थान देण्यात आले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mNfTtJ
No comments:
Post a Comment